Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २० फेब्रुवारीपासून ओला, उबरची सेवा राहणार बंद; नेमकं कारण काय?

Pune Breaking News: पुणे आणि चिंचवडमधील कॅब चालकांनी कामबंद आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या २० फेब्रुवारीपासून शहरातील ओला उबेरची सेवा बंद राहणार आहे.
Ola Uber Service In Pune
Ola Uber Service In PuneSaam TV
Published On

Ola Uber Service In Pune

पुणेकरांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. पुणे आणि चिंचवडमधील कॅब चालकांनी कामबंद आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या २० फेब्रुवारीपासून शहरातील ओला उबेरची सेवा बंद राहणार आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ola Uber Service In Pune
Weather Alert: विदर्भ-मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा ताजा अंदाज

कॅब चालकांकडून पुणे येथील आरटीओ ऑफिस येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. २० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या कामबंद आंदोलनात शहरातील जवळपास २० हजारांहून अधिक कॅबचालक सहभागी होणार, असा दावा डॉ. केशव क्षीरसागर यांनी केला आहे. (Latest Marathi News)

पुणे प्रादेशिक परिवहन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी कॅब कंपन्यांसाठी १ जानेवारी २०२४ पासून नवीन दरपत्रक जाहीर केले होते. मात्र ओला, उबर कंपन्यांनी नवीन दराची अद्याप अंमलबजावणी केली नाही, परिणामी आम्हाला फटका बसत असल्याचं कॅब चालकांनी म्हटलं आहे.

नवीन दर लागू झाल्यास कॅब चालकांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ होईल, आणि वाढीव दराचा व्यवसायावर परिणाम होईल. या भीतीने कॅब सेवा देणाऱ्या कंपन्या दर लागू करत नाहीये, असा आरोपही कॅब चालकांनी केला आहे.

त्यामुळं येत्या २० फेब्रुवारीपासून RTO पुणे येथे तीव्र निदर्शने व बेमुदत बंद आंदोलन करण्यात येईल. जोपर्यंत कंपन्या या दराची अंमलबजावणी करीत नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेऊ, असा इशाराच कॅबचालकांनी दिला आहे.

Ola Uber Service In Pune
Daily Horoscope: आजचे राशिभविष्य, १३ फेब्रुवारी २०२४ या ५ राशींचे बदलणार भाग्य; मिळणार मोठं यश

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com