THANE CRIME: RAM HEGDE FAMILY ALLEGEDLY THREATENED AT GUNPOINT saam tv
मुंबई/पुणे

पूर्णेकरांच्या प्रकरणानंतर ठाण्यात आणखी एका शिवसेनेच्या दिवंगत नगरसेवकाच्या कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवत धमकी

Gun Threat to Ram Hegde’s Family in Thane: ठाण्यात शिवसेनेचे दिवंगत नगरसेवक राम हेगडे यांच्या कुटुंबीयांना बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

विकास काटे, साम टीव्ही

शिवसेनेचे दिवंगत ज्येष्ठ नगरसेवक राम हेगडे यांच्या कुटुंबीयांना बंदुकीचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणाच्या घटनास्थळापासून काही अंतरावरच हा प्रकार घडल्याची माहिती आहे. राम हेगडे यांचा नातू प्रथम हेगडे हा परदेशातून ठाण्यात परतल्यानंतर आपल्या मैत्रिणीसोबत कासारवडवली येथील एका खासगी हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर प्रथम जेवण आणि त्यानंतर स्टार्टर आल्याने त्याने हॉटेल व्यवस्थापनाकडे याबाबत विचारणा केली.

याच कारणावरून प्रथम आणि हॉटेलमधील व्यवस्थापनामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर शिवीगाळ आणि पुढे मारहाण झाल्याचा आरोप प्रथम हेगडे यांनी केला आहे. हॉटेलच्या बाहेर पडल्यानंतर काही जणांनी आपल्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीमुळे डोळ्यासमोर अंधारी आल्याने आपण कसाबसा आपल्या आईला फोन केला, असे प्रथम हेगडे यांनी सांगितले.

यानंतर त्यांची आई आणि मावशी घटनास्थळी पोहोचल्या. त्यावेळी जमावातील काही जणांनी त्यांच्या आईला बंदुकीचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. यावेळी एका व्यक्तीने आपण आमदार प्रताप सरनाईक यांचा माणूस असल्याचे सांगितल्याचाही दावा कुटुंबीयांनी केला आहे.

इतकेच नाही, तर धारदार शस्त्रांचा धाक दाखवत धमकावण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारानंतर हेगडे कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांना फोन केला. मात्र, पोलिसांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

6 Exercise For Belly Fat: पोट सुटलंय, ढेरी कमी करण्यासाठी घरातच करा हे ६ प्रकारचे व्यायाम

भाजप आमदाराचा बंगला धुण्यासाठी २४ किमीवरून आली फायर ब्रिगेडची गाडी; व्हिडिओ व्हायरल होताच गदारोळ

Maharashtra News Live Update: निवडणूक आयुक्त आम्हाला का भेटत नाहीत? राहुल गांधींचा सवाल

CM Devendra Fadnavis: राहुल गांधींच्या नेतृत्वात दिल्लीत आंदोलन, मुख्यमंत्री फडणवीसांचा खळबळजनक आरोप

Pune : हिरवाईने नटलेली नऱ्हे टेकडी, फुलपाखरांचं जग; पुण्यात लपलंय 'हे' सुंदर लोकेशन |PHOTOS

SCROLL FOR NEXT