Thane Actor Prostitution Racket Police Busted News Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking : सेक्स रॅकेट चालवणाऱ्या अभिनेत्रीला ठाण्यात अटक, ज्युनिअर कलाकारांना फसवायची अन्..

Thane Actor Prostitution Racket Busted News : ठाण्यात अभिनेत्रीला सेक्स रॅकेट चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मॉडेलिंग आणि मालिकांमधील नवोदित तरुणींना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारात ढकलल्याचा आरोप आहे.

Alisha Khedekar

  • ठाण्यात अभिनेत्रीला सेक्स रॅकेट प्रकरणात अटक

  • बनावट ग्राहकाच्या मदतीने पोलिसांनी रचला सापळा

  • दोन पीडित तरुणींची सुटका

  • वर्षभरापासून रॅकेट सुरू असल्याची कबुली

  • गुन्हे अन्वेषण विभागाने केला मोठा पर्दाफाश

मनोरंजन क्षेत्रातून खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. एका अभिनेत्रीने दहा हजारांचे आमिष दाखवून टीव्ही मालिका तसेच मॉडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या नवोदित कलाकार तरुणींना सेक्स रॅकेटमध्ये अडकवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अभिनेत्रीला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी दाेन पीडित तरुणींची सुटका केली. त्यांना महिला गृहात पाठविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंदी मालिका आणि मॉडेलिंगमधील ज्युनिअर कलाकारांना जास्त पैशांचे आमिष दाखवून, त्यांना देह विक्रयाच्या व्यवसायात ढकलणारी अभिनेत्री दलाल म्हणून काम करत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला.

ठरलेल्या प्लॅनिंगनुसार, पोलिसांनी एक बनावट ग्राहक आरोपीकडे पाठवले. या बनावट ग्राहकाकडून तिने ३० हजार रुपये घेतले होते. मिळालेल्या माहितीची खात्री पटल्यावर उपायुक्त अमरसिंह जाधव, सहायक पोलिस आयुक्त रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पेालिस निरीक्षक वैशाली गोरडे, उपनिरीक्षक स्नेहल शिंदे आणि हवालदार व्ही. आर. पाटील आदींच्या पथकाने २८ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३५ च्या सुमारास मासुंदा तलाव परिसरात सापळा लावून अभिनेत्रीला अटक केली.

ती स्वत: काही हिंदी मालिकांमध्ये कलाकार म्हणून काम करत असून तिच्यासोबत मॉडेलिंग आणि यू ट्यूब चॅनलवर काम करणाऱ्या तिच्या ओळखीच्या काही महिला आणि तरुणींना ती शरीर विक्री करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे चौकशीत उघड झाले. वर्षभरापासून सेक्स रॅकेट चालवित असल्याची कबुलीही तिने पाेलिसांना दिली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

No Sugar Benefits: फक्त १५ दिवस साखर बंद केली तर शरीरात होतात 'हे' मोठे बदल; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

Bigg Boss Marathi 6 : कोणाचं नशीब बदलणार? 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी कोण उचलणार? ग्रँड फिनालेची तारीख अन् वेळ नोट करा

Maharashtra News Live Update: ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले

Lemon Sabja Water benefits: उन्हाळ्यात सकाळी लिंबू-सब्जा पाणी प्यायल्याने होतील हे ७ आरोग्यदायी फायदे

आणखी एका राज्यात भाजपचा मुख्यमंत्री, आजच होणार शपथविधी

SCROLL FOR NEXT