Thane Panchpakhadi building first floor fire 11 vehicles burned  Saam TV
मुंबई/पुणे

Thane Fire News: ठाण्यातील पाचपाखाडी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग; पार्किंगमधील ११ दुचाकी जळून खाक

Satish Daud

Thane Fire Incident

ठाणे शहरातील पाचपाखाडी परिसरातील सरीवर दर्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पार्किंगमध्ये अचानक आग लागली. या आगीत ११ दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. याशिवाय ३ चारचाकी वाहनांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पार्किंगमध्ये वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. आगीचं कारण अस्पष्ट आहे.

ठाण्यात १५ ठिकाणी आगीच्या घटना

ठाणे शहरात दिवाळीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी केली. त्यामुळे शहरात एकाच दिवशी १५ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. इमारतींमधील सदनिका, रस्त्यालगत असलेला कचरा तसेच झाडांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

वाघबीळ, कळवा, ठाणे जिल्हा मनोरुग्णालयजवळील परिसर, पाचपाखाडी, हायलॅंड गार्डन, कचराळी तलाव, आझादनगर, रामनगर अशा ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दलाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही आग तात्काळ विझविली.

सुदैवाने या घटनांमध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे बहुतांश ठिकाणी आग लागल्याची शक्यता ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी फटाके फोडताना काळजी घ्यावी, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT