Thane News Saam TV
मुंबई/पुणे

Thane News: माथाडी कामगार नेत्याच्या हत्येचा छडा; सापळा रचत पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहरात अशा पद्धतीने एका व्यक्तीची हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती.

साम टिव्ही ब्युरो

Thane News: ठाण्यातील कशेळी भागात एका महिण्याआधी अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला होता. यात माथाडी कामगार संघटनेच्या गणेश कोकाटे या व्यक्तीचा मृत्यू झाला. हत्या झाल्यानंतर आरोपी आणि त्याच्या साथीदाराने तेथून पळ काढला. अशात आता या घटनेत आरोपीचा शोध लागला असून त्याला बेड्या ठोकण्यात यश आले आहे. (Thane Latest News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहरात अशा पद्धतीने एका व्यक्तीची हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. तसेच पोलिसांसमोर आरोपींना शोधण्याचे मोठे आवाहन होते. महिन्याभरापासून त्यांचा शोध सुरू होता. मात्र महिनाभर आरोपी पसार होते. अशात ठाणे गुन्हे शाखा युनिट ५ने या प्रकरणात आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरानगर परिसरात आरोपी असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यावर त्यांनी सापळा रचत मुख्य आरोपी धनराज तोडणकर याला अटक केली. या प्रकरणात त्याचा साथीदार संदीपकुमार हा देखील आता पोलिसांच्या ताब्यात आहे.

साल २०१४ मध्ये मयत गणेश कोकाटे आणि धनराजचे जोरदार भांडण झाले होते. या वादात गणेशने धनराजला शिवीगाळ करत त्याचा खूप अपमान केला होता. हा राग मनात ठेवत धनराजने आपल्या साथिदारासह ७ डिसेंबर रोजी भर रस्त्यात गणेशवर गोळीबार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपी धनराज हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच तो अनेक वर्षे फरार होता, असे पोलिसांनी सांगितले. अशात आता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT