Thane Police School Saam Tv
मुंबई/पुणे

Thane News: फी न भरल्यामुळे १०० विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढलं, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

Priya More

विकास काटे, ठाणे

शाळेची वार्षिक फी न भरल्यामुळे १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शाळेबाहेर बसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्याच्या पोलिस स्कूलमध्ये (Thane Police School) ही घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना १२ जूनपर्यंत फी भरण्यासाठी वेळ देण्यात आला होता पण आज शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेबाहेर बसण्यात आले. यासंदर्भात पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. यासोबतच शिंदे गटाच्या युवासेनाप्रमुखांनी मुख्याध्यापकाला यासंदर्भात जाब विचारला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेची फी भरण्यासाठी दोन दिवस बाकी असतानाही ठाणे पोलिस स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढण्यात आले आहे. शाळेच्या व्यवस्थापकांकडून विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जवळपास १०० पेक्षा जास्त विद्यार्थी यामध्ये भरडले जात आहेत. शाळेने दिलेल्या फी भरण्याच्या ॲपमध्ये 12 जून ही शेवटची तारीख असतानाही आज शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले.

ठाणे पोलिस स्कूल आजपासून सुरू झाले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी सकाळी शाळेत आल्यानंतर थोड्याच वेळात पालकांना शाळेतून फोन गेले आणि तुमच्या पाल्यांची फी भरली नसल्याने तुम्ही त्यांना घेऊन जा असा निरोप देण्यात आला. यामुळे पालकांनी शाळेभोवती गराडा घातला असला तरी देखील शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच व्यवस्थापक यावर कोणतेही भाष्य करण्यास तयार नाहीत.

शाळेतून बाहेर काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या घटनेचा निषेध केला. शाळेकडून विद्यार्थ्यांवर ज्यापद्धतीने कारवाई करण्यात आली त्याबद्दल पालकांनी संताप व्यक्त केला. या घटनेनंतर शिवसेना युवासेना सचिव पूर्वेश सरनाईक यांनी शाळेचा मुख्याध्यापक यांना विचारणा केली असता त्यांनी जबाबदारी झटकली. या बाबतीत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे तक्रार करणार आली असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT