Residents store water as Thane prepares for a 12-day phased water supply shutdown due to Bhatsa gate repair work. Saam Tv
मुंबई/पुणे

Thane Water Shutdown News: ठाण्यात मोठी पाणीबाणी; तब्बल १२ दिवस पाणी कपात, कोणत्या भागांना बसणार फटका?

Thane 12 Days Water Cut Area Wise Schedule: भातसा नदीवरील न्युटिक गेट सिस्टीमच्या दुरुस्तीमुळे ठाणे शहरात पुढील १२ दिवस टप्प्याटप्प्याने पाणी कपात करण्यात येणार आहे.

Omkar Sonawane

ठाणे महानगरपालिका व बृहन्मुंबई महानगरपालिका यांना पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथे भातसा नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यावर बृहन्मुंबई महानगरपालिका यांचेमार्फत भातसा नदीच्या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी वाढविणेकरिता बसविण्यात आलेले न्युटिक गेट सिस्टीमची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी दिनांक २७.०१.२०२६ ते दि.०७.०२.२०२६ या कालावधीत न्युटिक गेट सिस्टीमची दुरुस्तीचे काम करणे करीता नदीच्या पाण्याची पातळी कमी करण्यात आली असून या कालावधीत पिसे येथील उदंचन केंद्रात पाण्याची पातळी खालावली आहे.

परिणामी, ठाणे महानगरपालिकेस होणारा पाणी पुरवठा २०% कमी झाला असल्याने ठाणे शहरातील पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने पुढील १२ दिवसांसाठी खालीलप्रमाणे पाण्याचे शटडाऊन घेऊन पाणी वितरणाचे नियोजन करण्यात केले आहे.

बुधवार दिनांक २८.०१.२०२६ रोजी गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा, वसंत विहार, लोकपुरम, लोकउपवन, एम. एम. आर. डी. ए. तुळसीधाम, वागळे MIDC, चिराग नगर, वर्तकनगर परिसर, समतानगर, वर्तकनगर, भिम नगर परिसर, ज्ञानेश्वर नगर, महात्मा फुले नगर, गंगाधर नगर, वैतीवाडी परिसरातील पाणी पुरवठा सकाळी ९.०० वाजल्यापासून ते दिनांक २९.१.२०२६ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे.

गुरुवार दिनांक २९.०१.२०२६ रोजी दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदय नगर, रेतीबंदर, सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर, सिद्धेश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चरई मावळी मंडळ, कोलबाड, गोकुळनगर, आजाद नगर, खोपट, सिव्हील हॉस्पीटल परिसर, आंबेडकर रोड परिसरातील पाणी पुरवठा सकाळी ९.०० वाजल्यापासून ते दिनांक ३०.१.२०२६ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे.

शुक्रवार ३०.०१.२०२६ रोजी शास्त्रीनगर नं 1 व २, लक्ष्मीपार्क, विहंग पार्क, सुरकरपाडा परिसर, सिद्धाचंल, कळवा, मनिषा नगर, खारेगाव, आतकोनेश्वर नगर, भास्कर नगर, पाँड पाडा, रघुकुल, पारसिक नगर परिसरातील पाणी पुरवठा सकाळी ९.०० वाजल्यापासून ते दिनांक ३१.१.२०२६ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे.

शनिवार दिनांक ३१.०१.२०२६ रोजी लोकमान्य नगर पाडा नं ३ व ४, इंदिरानगर, सावरकररनगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, रामनगर, कैलासनगर, जुनागाव, किसननगर, भटवाडी, श्रीनगर, शांतीनगर, रुपादेवी पाडा परिसरातील पाणी पुरवठा सकाळी ९.०० वाजल्यापासून ते दिनांक १.२.२०२६ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे.

रविवार दिनांक ०१.०२.२०२६ रोजी लोकमान्य नगर पाडा नं १, दोस्ती कॉम्प्लेक्स, वेदांत कॉम्प्लेक्स, कोरस नक्षत्र, रुणवाल कॉम्प्लेक्स परिसर, लोकमान्य नगर पाडा नं २, शास्त्रीनगर नं २, अरुण क्रिडा मंडळ, क्रोम पार्क, मोरेवाडी, गोकुळ नगर, आझाद नगर, मसनवाडा, रुतु पार्क परिसर, मनोरुग्णालय परिसर, शिवाजीनगर, रघुनाथ नगर, डिसोजा वाडी, कशिश पार्क, रहेजा गार्डन, ग्रीष्मा सोसायटी, धर्मवीर नगर, परबवाडी, इंटरनिटी कॉम्प्लेक्स, विष्णु नगर, भास्कर कॉलनी, ब्राम्हन सोसायटी, घंटाळी, राम मारुती रोड, साठेवाडी परिसरातील पाणी पुरवठा सकाळी ९.०० वाजल्यापासून ते दिनांक २.२.२०२६ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे.

सोमवार दिनांक ०२.०२.२०२६ रोजी बाळकुम, राम मारुती नगर, लोढा अमारा, कल्पतरु, ब्रम्हांड, रुतु सिटी, जेलटाकी परिसर, पोलीस लाईन, खारकर अली, जरीमरी, वृंदावन, श्रीरंग, विकास कॉम्पलेक्स, आंबेडकर नगर, क्रांती नगर, साकेत कॉम्पलेक्स, महागिरी, खारटन रोड, सिडको बस स्टॉप परिसर, कोपरी कोळीवाडा, पंचगंगा, राबोडी १ व २. आकाश गंगा परिसरातील पाणी पुरवठा सकाळी ९.०० वाजल्यापासून ते दिनांक ३.२.२०२६ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे.

मंगळवार दिनांक ०३.०२.२०२६ रोजी माजीवाडा, मानपाडा, कोठारी कंपाऊड, ढोकाळी, मनोरमा नगर, रुनवाल, डोंगरीपाडा, विजयीनगर, विजय पार्क, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली परिसरातील पाणी पुरवठा सकाळी ९.०० वाजल्यापासून ते दिनांक ४.२.२०२६ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे.

बुधवार दिनांक ४.०२.२०२६ रोजी गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा, वसंत विहार, लोकपुरम, लोकउपवन, एम. एम. आर. डी. ए. तुळसीधाम, वागळे MIDC, चिराग नगर, वर्तकनगर परिसर, समतानगर, वर्तकनगर, भिम नगर परिसर, ज्ञानेश्वर नगर, महात्मा फुले नगर, गंगाधर नगर, वैतीवाडी परिसरातील पाणी पुरवठा सकाळी ९.००वाजल्यापासून ते दिनांक ५.२.२०२६ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे.

गुरुवार दिनांक ०५.०२.२०२६ रोजी दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदय नगर, रेतीबंदर, सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर, सिद्धेश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चरई मावळी मंडळ, कोलबाड, गोकुळनगर, आजाद नगर, खोपट, सिव्हील हॉस्पीटल परिसर, आंबेडकर रोड परिसरातील पाणी पुरवठा सकाळी ९.०० वाजल्यापासून ते दिनांक ६.२.२०२६ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे.

शुक्रवार दिनांक ०६.०२.२०२६ रोजी शास्त्रीनगर नं 1 व २, लक्ष्मीपार्क, विहंग पार्क, सुरकरपाडा परिसर, सिद्धाचंल, कळवा, मनिषा नगर, खारेगाव, आतकोनेश्वर नगर, भास्कर नगर, पौंड पाडा, रघुकुल, पारसिक नगर परिसरातील पाणी पुरवठा सकाळी ९.०० वाजल्यापासून ते दिनांक ७.२.२०२६ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे.

शनिवार दिनांक ०७.०२.२०२६ रोजी लोकमान्य नगर पाडा नं १, दोस्ती कॉम्प्लेक्स, वेदांत कॉम्प्लेक्स, कोरस नक्षत्र, रुणवाल कॉम्प्लेक्स परिसर, लोकमान्य नगर पाडा नं २, शास्त्रीनगर नं २, अरुण क्रिडा मंडळ, क्रोम पार्क, मोरेवाडी, गोकुळ नगर, आझाद नगर, मसनवाडा, रुतु पार्क परिसर, मनोरुग्णालय परिसर, शिवाजीनगर, रघुनाथ नगर, डिसोजा वाडी, कशिश पार्क, रहेजा गार्डन, ग्रीष्मा सोसायटी, धर्मवीर नगर परिसर, परबवाडी इटरनिटी कॉम्प्लेक्स, विष्णुनगर, भास्कर कॉलनी, ब्राह्मण सोसायटी, घंटाळी, राम मारुती रोड, साठेवाडी परिसरातील पाणी पुरवठा सकाळी ९.०० वाजल्यापासून ते दिनांक ८.२.२०२६ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोगावलेंचा जामीन अर्ज फेटाळला, पोलिसांना आत्मसमर्पण, तुरुंगात जावं लागणार? राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Maharashtra Tourism: मुंबईपासून १४० किमी अंतरावर आहे,सुंदर हिल स्टेशन; लोणावळाही विसराल

Fack Check : सलमान खानचा MIM मध्ये प्रवेश? व्हायरल व्हिडिओने बॉलिवूडसह राजकीय वर्तुळात खळबळ

१०८ कोटी घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, बारामतीत ईडीने टाकली धाड; घरात काय घबाड सापडलं? VIDEO

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉकची घोषणा, लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द; प्रवाशांचे हाल होणार, कसं आहे रेल्वेचे वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT