Thane Muncipal Corporation Election 2026 Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : पुण्यानंतर आता ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? राजकीय हालचाली वाढल्या

Thane Muncipal Corporation Election 2026 NCP Political News : महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुण्यानंतर ठाण्यात अजित पवार आणि शरद पवार यांचे राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्र महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर

  • ठाण्यात अजित पवार आणि शरद पवार राष्ट्रवादी गटात युतीच्या चर्चा

  • कट्टर विरोधक मानले जाणारे नजीब मुल्ला आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात तणाव कमी होण्याचे संकेत

  • 30 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव आल्यास तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवला जाणार - नजीब मुल्ला

विकास काटे, ठाणे

राज्यात महापालिकेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याअसून प्रत्येक पक्ष जोमाने तयारीला लागला आहे. मुंबईसह अनेक पालिकांसाठी मनसे आणि उबाठा शिवसेना गटाची हातमिळवणी झाली असून दुसरीकडे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. प्रशांत जगताप यांच्या राजीनामा नाट्यानंतर ठाण्यातही अशीच हालचाल सुरु असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? हे गूढ कायम आहे.

अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे कट्टर विरोधक मानले जातात. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात महायुतीतून निवडणूक लढवली होती. आता त्या ठाण्यात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

ठाण्यात देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र?

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चांनंतर ठाण्यात देखील महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, "जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत. 30 तारखेपर्यंत जर आम्हाला कोणाचा प्रस्ताव आला तर आम्ही तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवणार आणि विचार करणार. शेवटी कार्यकर्त्यांना निवडून आणायचे आहे." असे राष्ट्रवादी ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला म्हणाले.

ठाणे शहरात जर पक्ष वाढवायचा असेल तर त्यांनी आता विचार करावा, असं सूचक वक्तव्य नजीब मुल्ला यांनी केलं. त्यामुळे ठाण्यातील शरद पवार गट देखील आता एक पाऊल पुढे टाकून अजित पवार गटासोबत युतीचा विचार करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान मनसे नंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने राज्यातील महापालिकांवर कोणत्या पक्षाचा विजयाचा झेंडा रोवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IDBI Recruitment: आयडीबीआय बँकेत नोकरीची संधी; १३०० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : राज ठाकरे रायगडावर दाखल

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात १९६०० रुपयांची घसरण; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

Bigg Boss Marathi 6 : रुचिता गेल्यावर विशालचा नवा गेम प्लान; थेट संपूर्ण घराशी घेतला पंगा, अखेर राखीने वैतागून केली 'ही' गोष्ट

Raj Thackeray : तुमची जात, तुमचा धर्म यापेक्षा... राज ठाकरेंची खास पोस्ट, तरूणांना आवाहन करत म्हणाले...

SCROLL FOR NEXT