CM Devendra Fadnavis Alleges Congress Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Poltitics: काँग्रेसला चीनकडून पैसा मिळतोय, मुख्यमंत्री फडणवीसांचा खळबळजनक दावा

CM Devendra Fadnavis Alleges Rahul Gandhi: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील लोकतंत्र बचाव रॅलीदरम्यान काँग्रेसवर गंभीर आरोप केला. काँग्रेसला चीनकडून पैसे मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.

Priya More
  • काँग्रेसला चीनकडून पैसा मिळत असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी केला

  • ठाण्यातील पदयात्रेत देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेसवर टीका

  • चीनकडून काँग्रेसला किती निधी मिळाला, फडणवीसांचा सवाल

ठाण्यातील महायुतीच्या लोकतंत्र बचाव पदयात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. इंडिया आघाडीच्या दिल्लीतील महामोर्चावर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी संविधानाचा चोर रस्त्यावर उतरले असल्याचे विधान केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर देशात अराजकता आणण्याचे षडयंत्र केले असल्याचा आरोप केला आहे. विरोधकांवर मुख्यमंत्र्यांनी संविधान चोर असल्याचा आरोप केला आहे. त्याचसोबत काँग्रेसला चीनकडून पैसा मिळत असल्याचा खळबळजनक दावा फडणवीस यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी आरोप केला की, 'या देशात काँग्रेसने लोकशाही संपवून अराजकता आणण्याचे षडयंत्र केले आहे. त्याविरोधात देशभक्त रस्त्यावर उतरले आहेत. तुम्ही संविधानाची चोरी केली आहे. हे संविधान चोर आहेत. या देशात बाबासाहेब यांनी संविधान सांगितले. जर यातील सगळ्यात महत्वाचे काय असेल तर जनतेला दिलेले अधिकार आहेत. हे अधिकार भारताला एकमत ठेवणारे आणि समतोल साधणारे आहेत. मूलभूत अधिकाराचे हनन झाले तर हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जाता येईल आणि कोर्टाला पहिली पिटिशन ऐकायला लागेल हा अधिकार दिला. काँग्रेसच्या सरकारने १९७६ साली मूलभूत अधिकार गोठवून टाकले. सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयात जाता येणार नाही असा बदल करून तुमच्या आणि आमच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणली. भाजपचे सरकार आल्यावर ते आपण पुन्हा केले.'

मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला चीनकडून पैसे मिळत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, 'हे संविधान चोर रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावे लागणार आहे त्यामुळे आपण रस्त्यावर उतरलो. आता पहिले तर इंदिराजी यांचा नातू हातात संविधान घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. आरे बॉटल वेगळी आहे पण दारू तीच आहे. राहुलजी मला उत्तर द्या भारताचा भारताला पाण्यात पाहण्यासाठी चीनकडून तुमच्या काँग्रेस पक्षाला किती निधी आला आहे. चीनकडून आलेले पैसे हे देशात वापरत आहेत. ते एक लाल पुस्तक दाखवत आहेत ना ते केवळ त्यांचा मास्क आहे. लाल पुस्तकाचा वापर करून त्यांनी हे षड्यंत्र करत आहेत. नेपाळचे संविधान बदलले आणि इतर देशाचे संविधान बदलले तसेच हे देशात करत आहेत.'

विरोधकांच्या आंदोलनावर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की'देशात अराजकता म्हणजे काय? तर हीच आहे अराजकता की सुप्रीम कोर्टावर मोर्चा घेऊन जातायत. तुम्हाला भारताची लोकशाही संपवायची आहे. यांचे षड्यंत्र समजून घ्या. लोकशाही विरोधी, संविधान विरोधी व्यवस्त्या यांना भारतात करायची आहे. संविधान विरोधी लोक रस्त्यावर उतरत असतील तर रस्त्यावर आम्ही मुकाबला करण्यासाठी तयार आहोत. या लोकशाहीने मोदीजीसारखा लोहपुरुष दिलाय. एसआयआरच्या विरोधात हे बोलत आहेत. मी काँग्रेसला विचारत आहे की २.५ कोटी लोकांची नावे यादीतून काढून टाकली मग काँग्रेसला काय वाटत आहे. काँग्रेसला माहिते की कुठेही एसआयआरमध्ये गडबड झाली नाही. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक झाली तिथे नावे कापली असती तर लोक येऊन बोलले असते की आमचे नाव कापले. या पदयात्रेने आपली जबाबदारी संपत नाही तर मोठी लढाई आहे. ही लढाई सोपी नाही आपल्याला लढाई लढावी लागेल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार! तरुणाने गुपचूप महिलांचे व्हिडिओ काढले अन्...

Cheese Balls Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि चीज भरलेले चीज बॉल्स, वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update: सावंतवाडी शहरात भरवस्तीत रान गव्यांचा कळप आला रस्त्यावर

Weight Loss Before Diwali: दिवाळीपर्यंत २ किलोपर्यंत वजन कमी करायचंय? डाएटिशियनच्या या ४ टिप्स फॉलो करा

दोन रुपयांत प्रॉपर्टी, ४० लग्जरी विला अन् कोट्यवधींची कमाई; IAS-IPS नवरा-बायकोच्या आलिशान काळ्या कमाईचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT