Bhiwadi Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Bhiwandi Crime News: संतापजनक! जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

Bhiwadi News: संतापजनक! जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

Satish Kengar

Bhiwadi Crime News:

एक संतापजनक बातमी समोर आली आहे. भिवंडीत एका 16 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. सात जणांच्या टोळक्याने या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. यातील चार आरोपीना पोलिसांनी सोमवारी अटक केल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सातमधील एक आरोपी पीडित मुलीच्या ओळखीचा होता. त्याने पीडितेला खरबाव रेल्वे स्थानकाजवळ बोलवलं होतं. अल्पवयीन मुलगी तिथे गेल्यानंतर या सात नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. यानंतर आरोपींची तिला, याबाबत कोणाला काहीही सांगू नकोस', असं धमकावत सांगितलं.

झालेल्या घटनेनंतर पीडित मुलगी खूपच घाबरलेली होती. यामुळेच तिने झालेल्या घटनेबद्दल कोणाला काहीच सांगितलं नाही, तसेच पोलिसात याची तक्रारही नोंदवली नाही. मात्र नंतर तिने आरोपीना शिक्षा झालीच पाहिजे, असं ठरवलं आणि हिंमत एकवटून पोलिसात तक्रार दाखल केली. (Latest Marathi News)

पीडितेने तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला. त्यांच्यावर ३७६डी आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. यामधील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर तीन आरोपी फरार आहे. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : दोन दिवसांपूर्वी वडिलांची आत्महत्या, ज्या झाडाजवळ आयुष्य संपवलं तिथेच चिमुकलीचा मृतदेह आढळला; बीड हादरले

Nagpur : दह्यामुळे कॅन्सर? नागपुरात ४ हजार किलो दही जप्त,नेमका प्रकार काय? |पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: Pune: वारजे पुलाखाली मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

Sand Mafia : वाळू माफियांची मुजोरी; तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

Pitra Dosh 2025: पितृ दोष असल्यास जीवनात 'हे' संकेत मिळतात

SCROLL FOR NEXT