प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी TVS मोटरची सर्वाधिक विक्री होणार स्कूटर म्हणजे 'ज्युपिटर'. आता कंपनीने या स्कूटरचे नवीन स्मार्ट व्हेरियंट लॉन्च केले आहे. Jupiter 125 Smart Connect असं या स्कूटरचे नाव आहे. ही स्कूटर अनेक स्मार्ट फीचर्ससह लॉन्च करण्यात आली आहे.
नवीन स्कूटर एलिगंट रेड आणि मॅट कॉपर ब्रॉन्झ अशा दोन नवीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. याची एक्स-शोरूम किंमत 96,855 रुपये आहे. ही स्कूटर होंडा अॅक्टिव्हाला टक्कर देईल.
या स्कूटरबद्दल माहिती देताना टीव्हीएस मोटर कंपनीचे कॉर्पोरेट ब्रँड आणि डीलर ट्रान्सफॉर्मेशन, कम्युटर्सचे उपाध्यक्ष अनिरुद्ध हलदर म्हणतात की, आजच्या व्यस्त जीवनात तंत्रज्ञानाशी जोडलेले राहणे अधिक फायदेशीर आहे. TVS Jupiter 125 SmartXonnect ची डिझाइज या गरजा लक्षात घेऊन करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
ज्युपिटर 125 स्मार्ट कनेक्ट फीचर्स
ज्युपिटर 125 स्मार्ट कनेक्टच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर, यात ब्लूटूथ कनेक्टेड टीएफटी डिजिटल क्लस्टरसह 'स्मार्टएक्सटॉक' सारखी फीचर्स आहेत. यात उत्तम राइड अनुभवासाठी TVS Connect मोबाईल अॅपद्वारे तुमचा स्मार्टफोन कनेक्ट करण्याची सुविधा देखील आहे.
यामध्ये तुम्हाला टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, व्हॉईस असिस्टंट, कॉल आणि मेसेज नोटिफिकेशन्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि फूड-शॉपिंग अॅप्सवरील अलर्ट, रिअल-टाइम स्पोर्ट्स स्कोअर, हवामान अपडेट्स आणि न्यूज अपडेट्स यांसारखी अनेक फीचर्स मिळतात.
या स्कूटरमध्ये अनेक सेगमेंट फर्स्ट फीचर्सचाही समावेश करण्यात आला आहे. यात आता फॉलो-मी हेडलॅम्प आणि हॅझर्ड लाइट्सची सुविधा आहे. यासोबतच पिलियन रायडर्स बॅकरेस्ट देखील देण्यात आले आहे, जे एक अतिशय महत्त्वाचे फीचर आहे.
ज्युपिटर 125 मध्ये नवीन 124.8cc सिंगल सिलेंडर, 2 वाल्व, 4-स्ट्रोक, एअर कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 6500 rpm वर 8.04 bhp ची पॉवर आणि 4500 rpm वर 10.5 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही 50 किमी/ली मायलेज देते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.