Dombivli Khoni illicit liquor bust material worth 2.40 lakh destroyed Saam
मुंबई/पुणे

डोंबिवलीत गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी दारूभट्टी उद्ध्वस्त, अडीच लाखांचा मुद्देमाल नष्ट

Dombivli Khoni illicit liquor bust material worth 2.40 lakh destroyed: डोंबिवलीतील खोणी परिसरात ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई. गावठी दारूभट्टी उद्ध्वस्त; २.४० लाखांचा मुद्देमाल नष्ट.

Bhagyashree Kamble

  • ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची खोणी गावात कारवाई

  • बेकायदेशीर गावठी दारूभट्टी उद्ध्वस्त

  • २.४० लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून नष्ट

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

ठाणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. पथकाने खोणी गाव परिसरात अवैधरित्या चालणारी गावठी दारूभट्टी उद्ध्वस्त करत जवळपास लाखोंचा मुद्देमाल नष्ट केला आहे. या कारवाईत तब्बल ₹२,४०,२०० किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२८ नोव्हेंबर २०२५ रोजी पोहवा आशिष ठाकूर यांना गुप्त बातमीदाऱ्याकडून माहिती मिळाली की, जयेश ठोंबरे (रा. खोणी गाव) हा नाल्याच्या बाजूला झाडीत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर हातभट्टीची दारू तयार करत आहे. यावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ छापेमारीची मोहिम राबवली.

पथकाची संयुक्त धडक सपोनि सुनील तारमळे यांच्या नेतृत्वाखाली पोहवा ठाकूर, पोहवा जाधव, चापोहवा हिवरे, पोशि वायकर यांच्यासह पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला. कारवाईदरम्यान खालील मुद्देमाल जप्त आणि नष्ट करण्यात आला.

१,५०,०००/- किमतीचा गुरळमिश्रीत व नवसागरमिश्रीत वॉश — १६०० लिटर

२००/- किमतीचा नवसागर

२०,०००/- किमतीची सलेले

१०,०००/- किमतीचे प्लॅस्टिकचे इम

६०,०००/- किमतीची गावठी दारु — ३०० लिटर

एकूण नष्ट केलेला मुद्देमाल — ₹२,४०,२००

या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहे. तसेच खंडणी विरोधी पथकाच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO 3.0 : PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! PF काढण्यापूर्वी 'या' गोष्टी तपासा, नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट

Raj Thackeray: "स्वतःच्या अंगाशी आलं की ते राजकारण"; मिसिंग लिंकवरून राज ठाकरेंनी सरकारला सुनावलं

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT