Thane Crime Saam tv
मुंबई/पुणे

Thane Crime : ठाण्यातील उपायुक्ताला २५ लाखांच्या लाचखोरीत अटक; आता फरार सुशांत अडकला

Thane Crime News : ठाण्यातील लाचखोरीच्या प्रकरणात कारवाई सुरुच आहे. लाचलुचपत खात्याच्या पथकाने आता फरार सुशांतला अटक केली आहे.

विकास काटे, ठाणे

उपायुक्त शंकर पाटोळे, ओमकार गायकर यांना २५ लाखांची लाच घेताना अटक

१० लाख रुपये सुशांतच्या खात्यावर ट्रान्स्फर झाल्याचे तपासात उघड

सुर्वे याला फरार घोषित केल्यानंतर अखेर गुरुवारी रात्री अटक

न्यायालयाने सुर्वेला ३ दिवसांची पोलीस कोठडी

ठाणे महापालिका मुख्यालय अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे आणि ओमकार गायकर या दोघांना २५ लाखाची लाच घेताना अटक केली. त्यानंतर लाचेची १० लाखांची रक्कम सुशांत सुर्वे याच्या बँक खात्यावर ट्रान्स्फर झाल्याचे तपासात समोर आलं होतं. मात्र सुशांत फरार झाला होता. ठाणे लाचलुचपत खात्याच्या पथकाने गुरुवारी रात्री त्याला बेड्या ठोकल्या आणि न्यायालयात नेले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी ठोठावलेली आहे.

ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात उपायुक्त शंकर पाटोळे, ओमकार गायकर यांच्यानंतर गुरुवारी रात्री फरार सुशांतला अटक करण्यात आलेली होती. तीन गाळ्यावर कारवाई केल्यानंतर विकासाचा मार्ग होणार होता. त्यासाठी तक्रारदाराने लाचेची रक्कम देण्यास तयार झाले होते. दरम्यान आणखी रक्कम मागितल्यानंतर तक्रारदाराने मुंबई लाचलुचपत खात्याकडे तक्रार केली.

तक्रार केल्यानंतर २५ लाखांचा हप्ता घेताना दोघांना अटक केली. मात्र सुरुवातीलाच लाचेची १० लाखाची रक्कम सुशांत सुर्वे याच्या बँकेत तक्रारदाराने ट्रान्स्फर केल्याने या लाच प्रकरणात सुशांत हा देखील सहभागी झाल्याचे तपासात समोर आलं. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात पाटोळे, गायकर आणि सुशांत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

काय आहे प्रकरण?

अभिराज डेव्हलपर्सच्या अभिजीत कदम यांच्याकडून घोडबंदर रोड या ठिकाणी बांधकाम सुरु होतं. अधिकाऱ्यांवर या ठिकाणी असलेलं अतिक्रमण हटवण्यासाठी 25 लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे. यासाठी 15 लाख रोख आणि 10 लाख रुपये सुशांत सुर्वे याच्या व्यक्तीच्या खात्यात घेऊन काम न केल्याने अभिराज डेव्हलपरच्या अभिजीत कदम यांनी तक्रार केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

SCROLL FOR NEXT