
तामिळनाडूमध्ये रावणाच्या जयघोषात भगवान श्रीरामाचा पुतळा जाळण्यात आलाय.
घटनेच्या विरोधात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट
पोलिसांकडून ३६ वर्षीय तरुणाला अटक
पोलिसांकडून वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा
तामिळनाडूच्या त्रिचीमधून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तामिळनाडूत रावणाचा जयघोष करत भगवान रामाचा पुतळा जाळल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. श्रीरामाचा पुतळा जाळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
देशभरात दसरा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. देशातील विविध भागात रावण दहन करून पारंपरिक दसरा सण साजरा करण्यात आला. उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात रावण दहना उत्सव पाहायला मिळतो. दुसरीकडे दक्षिण भारतात वेगळं चित्र पाहायला मिळालं आहे.
दक्षिण भारतातील तामिळनाडूतील एका गावात रावणाच्या ऐवजी श्रीरामाचा पुतळा जाळल्याची घटना घडली आहे. यावेळी व्हिडिओमधील उपस्थित लोकांनी रावणाचा जयजयकार केला. या घटनेनंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नेटकऱ्यांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. भारतीय न्याय संहितेच्या १९२, १९६ (१)(ए), १९७, २९९, ३०२ आणि ३५३ (२) कलमांतर्गत आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका ३६ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं आहे. तर या प्रकरणातील आणखी आरोपींचा पोलिसांकडून सुरु आहे.
पोलिसांनी वादग्रस्त पोस्ट करून सामाजिक स्वास्थ बिघडवणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे. या प्रकरणाशी संबंधित कोणी वादग्रस्त पोस्ट केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.