विकास काटे, ठाणे
कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा लोकांची डोकेदुखी वाढवली आहे. देशात गेल्या काही दिवसांत कोरोनामुळे पाचहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. वेगाने पसरणाऱ्या Covid JN.1 या नव्या व्हेरिएंटमुळे देशातील अनेक राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याचदरम्यान, ठाण्यातील कळवा रुग्णालयात कोरोनाचा नवा व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे. यामुळे रुग्णालय प्रशासन सतर्क झालं आहे. (Latest Marahi News)
कोरोना या महामारी आजारामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकविला होता. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हा आजार हद्दपार झाल्याने आरोग्य यंत्रणेसह सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला होता. त्यातच मंगळवारी सायंकाळी ठाणे महापालिका हद्दीत एक १९ वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तरुणीला कोरोनाची लागण झाल्याने समोर आल्याने रुग्णालयात प्रशासानातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. कोरोनाची लागण झालेल्या तरुणीवर ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
या तरुणीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात येणार आहे. या अहवालानंतर कोरोनाचा कोणता व्हेरिएंट आहे, हे स्पष्ट होणार आहे.
नाशिक जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्याचं समोर आला आहे. झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे. झिका विषाणूचा रुग्ण आढळल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे. यानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर रुग्ण राहत असलेल्या परिसरात स्क्रिनिंग सुरु केली आहे.
या स्क्रिनिंगदरम्यान, विशेष म्हणजे गरोदर महिलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. पालिकेकडून आतापर्यंत ३४८० घरांचे सर्व्हे करण्यात आलं आहे. तसेच आतापर्यंत 15,718 लोकांची स्क्रिनिंग करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.