Thane Coastal Road Saam Tv
मुंबई/पुणे

Thane Coastal Road: घोडबंदरची वाहतूक कोंडी कायमची फुटणार! ठाणे कोस्टल रोडचे काम किती पूर्ण? वाचा अपडेट

Thane Coastal Road Work Update: घोडबंदर रोडवरची वाहतूक कोंडी कायमची फुटणार आहे. ठाणे कोस्टल रोडचे काम सुरु झाले आहे. हे काम लवकरच पूर्ण होऊन प्रवाशांसाठी सुरु केला जाईल, असं सांगण्यात येत आहे.

Siddhi Hande

ठाणे कोस्टल रोडच्या कामाला सुरुवात

घोडबंदरवरची वाहतूक कोंडी कायमची फुटणार

पहिल्या टप्प्यातील काम सुरु

ठाणेकरांचा प्रवास खूप जलद होणार आहे. मुंबईच्या धर्तीवर आता ठाण्यातही कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. कोस्टल रोडमुळे घोडबंदरवरील वाहतूक कोंडी कायमची बंद होणार आहे. सध्या घोडबंदरवरुन वाहतूक करताना एक-दीड तास वाहतूक कोंडीतच जातो. दरम्यान, आता कोस्टल रोडमुळे यापासून दिलासा मिळणार आहे. कोस्टल रोडचे काम सुरु झाले आहे.

कोस्टल रोडचे काम दोन टप्प्यात होणार आहे. बाळकुंभ ते गायमुखदरम्या १३.४५ किलोमीटरचा ६ पदरी कोस्टल रोड बांधण्यात येणार आहे. याचे काम वेगाने सुरु आहे. आठ महिन्यांपूर्वी या कोस्टल रोडचे काम सुरु केले होते. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने हे काम सुरु केले होते.

आठ महिन्यातच कोस्टल रोडच्या पायाभूत कामाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर खांबावर पिलर कॅप, गर्डर्स बसवण्याचे काम सुरु झाले आहे.

एमएआरडीएच्या मते, ठाणे कोस्टल रोड हा देशातील पहिला ग्रीनफिल्ड कोस्टल रोड प्रकल्प आहे. या प्रकल्पात पहिल्यांदाच मोनोपाइल फाउंडेशन, सिंगल पाइप या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पर्यावर संवर्धन आणि खारफुटी क्षेत्रांचे संरक्षण करण्याचे प्राधान्य दिले जाईल.

मुंबई-नाशिक महामार्गावरील प्रवाशांना दिलासा

हा मार्ग मालवाहतूकीसाठी कयार केला जात आहे. कोस्टल रोडमुळे मुंबई-नाशिक महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. घोडबंदर रोडवर नेहमीच वाहनाच्या लांबच लांब रांगा असतात. भिंवडी आणि कळवा येथून घोडबंदरकडे जाणारे प्रवासी अडकतात. जर कोस्टल रोड सुरु झाला तर नाशिक, भिवंडी, गुजरात आणि मुंबई उपनगरांकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग मिळणार आहे.बाळकुंभ येथून थेट कोस्टल रोडवर जाता येणार आहे.

एमएमआरडीएने कोस्टल रोडला गायमुख फाउंटन हॉटेल टनेल प्रकल्पाशी जोडण्याची तयारी करत आहे. यामुळे वाधवान बंदर, जेएनपीटी, दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे महामार्गावरु जाणाऱ्या वाहनचालकांना फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Politics : ठाण्याच्या राजकारणात खळबळ! शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, कारण काय?

Kalyan Crime: पूजा पाठ करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, कल्याणमधील संतापजनक घटना

NEET UG Exam: नीट पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई, देशभरातून १६ संशयितांना ताब्यात

भाजप नेत्याकडून PM मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाकडे दुर्लक्ष; ५०० वाहनांचा ताफा काढून केलं शक्तिप्रदर्शन, VIDEO

SSC Supplementary Exam 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या दिवसापासून पुरवणी परीक्षेसाठी करता येणार अर्ज

SCROLL FOR NEXT