THANE CHILD ABUSE CASE: MOTHER ACCUSED OF TORTURING 3.5-YEAR-OLD SON, POLICE INVESTIGATION UNDERWAY Saam tv
मुंबई/पुणे

Thane : ठाण्यातील धक्कादायक घटना! पोटच्या मुलाला आईने केली अमानुष मारहाण; चटके दिले अन्...

Thane News : ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील किसन नगर येथे साडेतीन वर्षांच्या मुलावर आईकडून अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. जखमी मुलावर उपचार सुरू असून पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे.

Alisha Khedekar

  • ठाण्यातील किसन नगर येथे साडेतीन वर्षांच्या मुलाला अमानुष मारहाण

  • मुलाच्या शरीरावर जखमा व चटक्यांच्या खुणा

  • मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू

  • आईनेच केली मुलाला मारहाण

विकास काटे, ठाणे

ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसरातील किसन नगर येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यावर त्याच्याच आईने अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून संबंधित महिलेवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किसन नगर येथील शाळा क्रमांक ३ मध्ये शिकणारा साडेतीन वर्षांचा मुलगा काल दुपारी आपल्या आजीसोबत जवळील शिवसेना मध्यवर्ती शाखेत गेला. यावेळी मुलाच्या शरीरावर जखमांच्या खुणा दिसून आल्या. शाखेत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्याची विचारपूस केली असता, त्याला मारहाण करण्यात आल्याचे सांगितले. तसेच गरम उलथण्याने हात-पायांवर चटके दिल्याचेही त्याने म्हटले.

मुलाची अवस्था पाहून शिवसेना शाखाप्रमुख सुनील मोरे यांनी तातडीने पुढाकार घेतला. त्यांनी मुलाला जवळील रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचारांची व्यवस्था केली. डॉक्टरांकडून मुलाच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुनील मोरे यांनी महिला पदाधिकाऱ्यांसह संबंधित महिलेच्या घरी भेट दिली. त्यानंतर त्या महिलेला वागळे इस्टेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्वतःच्या आईनेच एवढ्या लहान मुलावर अत्याचार केल्याचा आरोप समोर आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.दरम्यान, वागळे इस्टेट पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Schezwan Fried Rice Recipe: रेस्टॉरंटस्टाईल झणझणीत शेझवान फ्राइड राईस बनवा घरी, वाचा सोपी रेसिपी

Cold drink sugar content: कोल्ड्रिंकच्या एका ग्लासात किती प्रमाणात साखर असते? वाचून तुम्हालाही बसेल धक्का

BJP Reshuffle : अंतर्गत वाद मिटवण्यासाठी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक', एकाच वेळी ३६ जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलले, पाहा यादी

Gold Rate Today: पहिल्या श्रावण सोमवारी सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा 18 -22 आणि 24 कॅरेटचे दर

Pune : पुण्यात रिलस्टारवर कोयत्याने हल्ला; प्रसिद्ध रिलस्टारसह ७ जणांना अटक, नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT