Schezwan Fried Rice Recipe: रेस्टॉरंटस्टाईल झणझणीत शेझवान फ्राइड राईस बनवा घरी, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

२ वाट्या शिजवलेला भात, २ टेबलस्पून शेझवान सॉस, १ कांदा, १ गाजर, ½ कप कोबी, ½ कप शिमला मिरची, २ हिरव्या मिरच्या, सोया सॉस, व्हिनेगर, तेल, मीठ आणि मिरी पावडर घ्या.

Schezwan Fried Rice

भात तयार करा

तांदूळ जास्त मऊ न शिजवता मोकळा शिजवा. शिजलेला भात पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड भात वापरल्यास फ्राइड राईस अधिक मोकळा आणि स्वादिष्ट होतो.

Schezwan Fried Rice

भाज्या परतून घ्या

कढई किंवा वोकमध्ये तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, गाजर, कोबी आणि शिमला मिरची घालून मोठ्या आचेवर काही मिनिटे परता.

Schezwan Fried Rice

शेझवान सॉस घाला

भाज्या हलक्या कुरकुरीत झाल्यावर त्यात शेझवान सॉस, सोया सॉस, थोडे व्हिनेगर, मीठ आणि मिरी पावडर घाला. सर्व साहित्य चांगले एकत्र करा.

Schezwan Rice | yandex

थंड भात मिसळा

आता कढईमध्ये थंड केलेला शिजवलेला भात घाला. भाताचे दाणे तुटणार नाहीत याची काळजी घेत हलक्या हाताने सर्व मिश्रण एकत्र करा.

Schezwan Fried Rice | yandex

मोठ्या आचेवर फ्राय करा

भात आणि भाज्या मोठ्या आचेवर २ ते ३ मिनिटे सतत हलवत फ्राय करा. यामुळे शेझवान सॉसचा स्वाद भातामध्ये छान मिसळतो आणि रेस्टॉरंटसारखा फ्लेवर मिळतो.

Schezwan Fried Rice

गरमागरम सर्व्ह करा

तयार झालेला झणझणीत शेझवान फ्राइड राईस गरमागरम सर्व्ह करा. सोबत चिली पनीर, मंच्युरियन किंवा रायता दिल्यास जेवणाची चव आणखी वाढते.

Schezwan Fried Rice | Google

Vangi Kaap: चपाती किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत आणि चविष्ट वांगी काप; वाचा सोपी रेसिपी

Vangi Kaap Recipe | एोोस ऊन
येथे क्लिक करा