Manoj Jarange Patil News Saam Tv
मुंबई/पुणे

Manoj Jarange Patil: 'मराठा आरक्षण कोणी रोखू शकत नाही..' CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जरांगे पाटील कडाडले!

Manoj Jarange Patil Sabha Thane: मराठ्यांच्या जवळपास 32 लाख ओबीसी नोंदी सापडल्या आहेत. आतापर्यंत 85 टक्के लढा झाल्याचेही ते म्हणाले.

विकास काटे, ठाणे

Manoj Jarange Patil News:

मराठा आरक्षणाचा लक्षवेधी लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. ठिकठिकाणी भेटी देत आहेत. लोकांशी संवाद साधत आहेत. आज जरांगे पाटील हे ठाणे शहरात आहेत. ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन मोठे विधान केले असून आमच्या नोदीं मिळत आहेत, त्यामुळे मराठा आरक्षणापासून कोणीही रोखू शकत नाही.. असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?

"मराठ्यांच्या जवळपास 32 लाख ओबीसी नोंदी सापडल्या आहेत. आतापर्यंत 85 टक्के लढा झाला. मराठ्यांच्या विजयाचा क्षण बघायचा आहे. मराठ्यांनी पुढील काळात एकजुटीने ठेवा. ताळमेळ हुकला नाही म्हणून इथवर आपण लढा जिंकलो.." असे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यावेळी म्हणाले.

तसेच "राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे का? जातीय दंगली भडकावून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जातोय. आम्ही कायदा-सुव्यवस्था राखतोय, तरी गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र गुन्हे दाखल केले तरी आम्ही थांबणार नाही, मराठी आणि ओबीसीत वाद निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न करतोय," असं जरांगे पाटील म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, "ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहात मनोज जरांगे पाटील यांची ही सभा झाली. त्याआधी जरांगे पाटील यांचे ठाण्यात जोरदार स्वागत झाले. २५ जेसीबीमधून त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. या दौऱ्यावेळी शहरातील चौकाचौकांत, मुख्य नाक्यांवर, रस्त्यांच्या दुतर्फा मराठा समाजाच्या सर्वपक्षीय नेत्यांनी मोठी बॅनरबाजी केल्याचेही पाहायला मिळाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: नवीन वर्षात लाडक्या बहि‍णींना खुशखबर मिळणार! या दिवशी खात्यात ₹४५०० जमा होण्याची शक्यता

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्री नंदिनी सीएमची आत्महत्या; मनोरंजन क्षेत्रात खळबळ

Budh Gochar: जानेवारीत बुध करणार शनीच्या घरात प्रवेश; ‘या’ 3 राशींना करिअर-व्यवसायात भरपूर यश मिळणार

Matar Kanda Poha Recipe: सकाळच्या नाश्त्याला बनवा मस्त मटार कांदापोहे, सोपी आहे रेसिपी

Maharashtra Live News Update : अकोला महापालिकेत 'भाजप-राष्ट्रवादी' युतीची घोषणा

SCROLL FOR NEXT