Manoj Jarange Patil: घाबरणार नाही!; सभा आयोजकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोज जरांगेंनी ठणकावून सांगितलं

Maratha Reservation: आम्ही सरकारचं काम करतोय. उलट सरकारने सभा घेण्यास परवानगी दिली पाहिजे. मात्र आम्हाला खिंडीत पकडायचं म्हटलं तर पुढे बघू असा इशारा जरांगेंनी दिलाय.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam TV

Manoj Jarange Patil:

समाजातला रोष आता सभांमुळे काही अंशी कमी झालाय. आमचा एकही माणूस अशा कारवाईला घाबरणार नाही. आम्ही समाजासाठी काम करतोय. कारवाई करणाऱ्या पोलीस बांधवांवर दबाव असू शकतो, असा आरोप जरांगे पाटलांनी केलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील राज्यात विविध ठिकाणी भेट देत सभा घेत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून रात्री उशिरा पार पडणाऱ्या सभांवर धाराशीवमध्ये पोलिसांकडून कारवाईला सुरुवात झालीये. सभेच्या आयोजकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. या कारवायांना आम्ही घाबरत नसल्याचं मनोज जरांगे पाटलांनी ठामपणे सांगितलं आहे.

क्रिकेट रात्रभर चाललं तर ते चालतं. तिथे काय तोंडाला बांधलेलं नसतं. तोंडाला टाके टाकलेले नसतात, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. रात्री उशिराने होणाऱ्या सभांमध्ये आयोजकांवर गुन्हे दाखल होतायत. पोलिसांची कारवाई सुरू झाली आहे, याबाबत बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारने गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू करून चांगलं काम केलंय, अशी उपहासात्मक टीका केली आहे.

गरीबांचा प्रश्न मार्गी लागूनये असं सरकरला वाटतं त्यामुळे क्रिकेट रात्रभर चालले तरी चालतं तिथे काय तोंडाला बांधलेलं नसतं. तोंडाला टाके टाकलेले नसतात. मराठा समाजात आतापर्यंत असलेला रोष सभांमुळे काही अंशी कमी झालाय. आम्ही सरकारचं काम करतोय. उलट सरकारने सभा घेण्यास परवानगी दिली पाहिजे. मात्र आम्हाला खिंडीत पकडायचं म्हटलं तर पुढे बघू असा इशारा जरांगेंनी दिलाय.

मनोज जरांगे पाटील यांचा बदलापुरातील कार्यक्रम रद्द

आज ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil) उपस्थित राहणार होते. मात्र बदलापूर पूर्व भागात असलेला छत्रपती शिवाजी महाराज चौक हा लहान आणि अरुंद असल्याने जरांगे पाटील यांच्या कार्यक्रमाला होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन, पोलिसांवर अतिरिक्त भार येणार होता. याबाबत जरांगे पाटील यांना समजल्यावर त्यांनी बदलापूरचा कार्यक्रम रद्द केला आहे. मात्र बदलापूरमध्ये होणाऱ्या मराठा महोत्सवाला मी नक्की येईल असं आश्वासन जरांगे यांनी बदलापूरकरांना दिलंय, अशी माहिती बदलापूर सकल मराठा समाजाचे समन्वयक अविनाश देशमुख यांनी दिली आहे

संताजी धनाजी सारखा भुजबळ यांना सगळ्या ठिकाणी मीच दिसतो; मनोज जरांगे पाटील यांची भुजबळांवर टीका

भुजबळांना संताजी धनाजी सारखा आता सगळ्या ठिकाणी मीच दिसतोय. त्यांना वैयक्तिक विरोध नव्हता मात्र वैचारिक विरोध होता. सुरुवात त्यांनी केली, मराठा आरक्षणाला विरोध करण्याची गरज नव्हती. त्यामुळे आता त्यांच्यावर टीका करणार असं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.

Manoj Jarange Patil
Mumbai Crime News: राष्ट्रीय तपास यंत्रणेची मोठी कारवाई, लष्कराची गोपनीय माहिती लीक प्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com