Man Attacks Sleeping Wife with Axe  Saam tv
मुंबई/पुणे

Crime : संशयाचे भूत डोक्यात शिरले; पतीने पत्नीच्या डोक्यात टीव्ही फोडला, ठाण्यातील भयंकर घटना

Thane Bhiwandi latest murder case : ठाण्यातील भिवंडीत चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात टीव्ही मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

Namdeo Kumbhar

Thane Bhiwandi husband Wife murder case : ठाण्यातील भिवंडी परिसरात एक थरारक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये भयंकर वाद झाला अन् हत्येची घटना घडली. ३५ वर्षीय पतीने आपल्या राहत्या घरात रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात थेट टीव्ही सेट मारून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपी पतीला तातडीने अटक केली आहे.

सतीश कालूराम वाघे उर्फ गुड्डू (वय ३५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. तर सारिका वाघे (वय २०) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री भिवंडी परिसरातील एका घरात ही घटना घडली. आरोपी सतीशला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सतत वाद होत होते. शनिवारी रात्री देखील दोघांमध्ये याच कारणावरून जोरदार वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात सतिशने घरातील टीव्ही सेट उचलला आणि थेट सारिकाच्या डोक्यावर मारला.

टीव्हीचा वार इतका भीषण होता की सारिकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अन् जागीच मृत्यू झाला. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर सतीशने स्वतःच शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर शेजाऱ्यांनी तातडीने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच भिवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सारिकाचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी पती सतीश वाघे याला अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(१) (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT