bhiwandi furniture market fire news today Saam TV marath
मुंबई/पुणे

Bhiwandi Fire : फर्निचर बाजारात आग्नितांडव, १५ दुकानांचा कोळसा, भिवंडीत जिकडे तिकडे धूरच धूर

bhiwandi furniture market fire news today : भिवंडीतील कशेळी खाडी परिसरातील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागून १५ दुकाने जळून खाक झाली. कोट्यवधींचे नुकसान झाले असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Namdeo Kumbhar

kasheli creek fire incident details bhiwandi : भिवंडी-ठाणे रस्त्यावरील कशेळी खाडी जवळ असलेल्या प्रसिद्ध फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत फर्निचरची तब्बल १५ दुकानांचा कोळसा झाला आहे. या अग्नितांडवात व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळीवर अग्निशामक दलाच्या 3 गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. आग इतकी भीषण आहे की भिवंडीमध्ये धुराचे लोट दिसत आहे. सुदैवाने या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत जिवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही. (Bhiwandi Fire: 15 Furniture Shops Destroyed in Massive Blaze Near Kasheli)

स्थानिक रिपोर्टरने दिलेल्या माहितीनुसार, कशेळी खाडी परिसरातील फर्निचर मार्केटमध्ये दुपारी अचानक आग लागली. फर्निचरसाठी लागणारे लाकूड, फोम, कापड आणि केमिकल यामुळे काही वेळातच आगीने रौद्र रूप घेतले. आगीचे लोट आणि धुराचे लोळ भिवंडी शहरातून लांबूनही दिसत होते. आगीच्या या घटनेमुळे भिवंडी आणि परिसरात भीतीचे वातवऱण होते. घटनेची माहिती मिळताच भिवंडी महानगरपालिका अग्निशमन दलाच्या ३ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवले आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

फर्निचर मार्केटमध्ये आग लागल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. आग पसरत असल्याचे पाहून आजूबाजूच्या दुकानदारांमध्ये मोठी पळापळ सुरू झाली. आपले नुकसान टाळण्यासाठी अनेक दुकानदारांनी दुकानातील तयार फर्निचर रस्त्यावर काढले. भररस्त्यात फर्निचर काढल्यामुळे त्याचा वाहतुकीवरही परिणाम झाला होता. दरम्यान, या भीषण आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

स्थानिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास आगीची माहिती मिळाली. घटनास्थळावरून धुराचे लोट वर जाताना दिसत होते. या आगीमध्ये फर्निचर साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोदामाला सर्वाधिक नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ आग विझवण्याचे काम सुरू करण्यात आले. स्थानिक अग्निशमन दलाचे जवान दोन अग्निशमन गाड्यांसह घटनास्थळी पोहोचले, तर ठाणे अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी मदत म्हणून एक जंबो पाण्याचा टँकर तैनात केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पथके सक्रियपणे काम करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संकुलामध्ये आग आणखी पसरू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भिवंडी-ठाणे मार्गावर भीषण आग, मार्केटमधील फर्निचरची १५ दुकाने खाक

HDFC Bank च्या चेअरमनचा अचानक राजीनामा, धक्कादायक कारण आले समोर

Viral Video: ट्रकला अचानक लागली आग, ७० वर्षीय ड्रायव्हरने पेटता ट्रक चालवत थेट नेला फायर स्टेशनमध्ये, पाहा Video

Curd Benefits: उन्हाळ्यात दही कधी खावे?

Jio Recharge: खुशखबर! Jio युजर्सना 3 महिन्याच्या रिचार्जसाठी मोजावे लागणार फक्त इतके रुपेय, मिळणार अनेक भन्नाट सुविधा

SCROLL FOR NEXT