Thane Crime News  Saam tv
मुंबई/पुणे

Thane Crime News : भिवंडीतील १६ वर्षीय तरुणीचा रौद्र अवतार; अपहरणाचा डाव उधळला, रिक्षाचालकावर करकटकने हल्ला

Bhivandi News : भिवंडीतील एका १६ वर्षीय विद्यार्थिनीने हुशारीने भूमिती कंपास वापरून तिच्या अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला. चालत्या रिक्षातून उडी मारून ती शाळेत पोहोचली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

भिवंडीतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका १६ वर्षीय मुलीने हुशारी दाखवत रिक्षाने शाळेत जात असताना रिक्षाचालकावर भूमिती कंपासने हल्ला करून तिच्यावर होणाऱ्या अपहरणाचा डाव उधळून लावला आहे. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस गुन्हेगाराचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ जुलै रोजी विद्यार्थिनीला शाळेत जात असताना उशीर झाला होता. म्हणून ती घाईघाईने रिक्षात चढली. त्यात एक अज्ञात पुरूष आधीच उपस्थित होता. जेव्हा गाडी तिच्या शाळेजवळ पोहोचली तेव्हा मुलीने रिक्षा चालकाला तिथे थांबण्यास सांगितले, परंतु त्याने तसे केले नाही आणि त्याऐवजी त्याने वेगाने गाडी चालवली.

आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडत असल्याची शंका येताच विद्यार्थीनी सावध झाली. आणि तिने हुशारी दाखवत तिच्या शाळेच्या बॅगेतून एक भूमिती कंपास काढला आणि त्या चालकावर जोरदार हल्ला केला. तसेच तिने तिच्या शेजारी बसलेल्या माणसालाही ढकलून दिले आणि चालत्या रिक्षातून तिने उडी मारली. त्यानंतर ती तिच्या शाळेत पोहोचण्यात यशस्वी झाली.

तिने ही घटना आपल्या पालकांना सांगितली त्यानुसार मुलीच्या पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १३७(२) (अपहरण) आणि ६२ (आजीवन कारावास किंवा इतर कारावासाची शिक्षा असलेले गुन्हे करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. "या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे," असे अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात; कंटेनर,कार, दुचाकीची एकमेकांना धडक, तिघांचा जागीच मृत्यू

Sunday Horoscope : व्यवसायात लाभ होणार; ५ राशींच्या व्यक्तींना धनलाभ होणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Acidity : ॲसिडीटीमुळे जुलाब होतायेत? स्वयंपाकघरातील 'हा' पदार्थ ठरेल वरदान, पोटातील गडबड झटक्यात होईल गायब

Sejal Pawar: प्रणित मोरेच्या शोमध्ये नको ते बरळणाऱ्या सेजल पवार आधी FIR दाखल, आता KEM कॉलेजकडून मोठी कारवाई

Maharashtra News Live Update : बालगंधर्वमधील शोकसभेमुळे नागरिक संतप्त; नाटकाला उशिर होत नाट्य प्रेमी संतापले

SCROLL FOR NEXT