Banana Storage : बाजारातून घरी आणल्यानंतर केळी लगेच काळी पडतात? जास्त दिवस ताजी राहावीत यासाठी करा 'हे' 6 सोपे उपाय

Alisha Khedekar

फ्रिजमध्ये ठेवू नका

केळी लगेच फ्रिजमध्ये ठेवू नका. थंड तापमानामुळे साल लवकर काळी पडू शकते, त्यामुळे ती बाहेरच ठेवा.

how to keep bananas fresh for longer | Google

देठाला प्लास्टिक गुंडाळा

केळ्याच्या देठाभोवती प्लास्टिक रॅप गुंडाळल्यास पिकण्याची प्रक्रिया थोडी मंद होते आणि केळी जास्त काळ ताजी राहतात.

how to keep bananas fresh for longer | Google

हुकवर टांगून ठेवा

केळी टोपलीत ठेवण्याऐवजी हुकवर टांगून ठेवा. त्यामुळे त्यांना दाब बसत नाही आणि सालावर काळे डाग कमी पडतात.

how to keep bananas fresh for longer | Google

सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा

केळी थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका. उष्णतेमुळे ती वेगाने पिकतात आणि काही दिवसांत साल काळसर होऊ शकते.

how to keep bananas fresh for longer | Google

देठ वेगळे करून ठेवा

घडातील केळी वेगळी करून ठेवल्यास पिकण्याची प्रक्रिया काही प्रमाणात मंदावते. त्यामुळे प्रत्येक केळे थोडे जास्त काळ टिकते.

how to keep bananas fresh for longer | Google

हवेशीर जागा निवडा

केळी बंद डब्यात ठेवण्याऐवजी हवेशीर जागी ठेवा. योग्य हवेच्या प्रवाहामुळे ओलावा कमी राहतो आणि खराब होण्याचा धोका घटतो.

how to keep bananas fresh for longer | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

how to keep bananas fresh for longer | Google

NEXT : कारमधून सतत पेट्रोल डिझेलचा वास येतोय? 'ही' ६ कारणे वेळीच जाणून घ्या

Car Smells Of Petrol Or Diesel Know 6 Possible Causes | AI Image
येथे क्लिक करा