Manasvi Choudhary
पाहुण्यांना भेट देण्यासाठी छोटी गणपतीची मूर्ती किंवा फोटो फ्रेम द्या.
पणत्या आणि सुवासिक मेणबत्त्या द्या. घरात सकारात्मक वातावरण राहील.
बाप्पाच्या प्रसादासोबतच थोडे काजू, बदाम किंवा ड्रायफ्रुट्स बॉक्स भेटवस्तू म्हणून द्या.
छोट्या पॉटमध्ये लावता येतील अशी छोटी रोपे, मनी प्लांट भेट म्हणून द्या.
पाहुण्यांसाठी श्रीफळ देण्याचा मान मोठा असतो. तुम्हाला कमी किंमतीत, कमी वेळात गिफ्ट घ्यायचे असेल तर तुम्ही श्रीफळ देऊ शकता.
सुवासिक अत्तर तुम्ही पाहुण्यांसाठी भेटवस्तू म्हणून निवडू शकता.
जर तुम्हाला काही युनिक आणि हटके द्यायचे असेल तर तुम्ही तांब्याचे छोटे भांडे द्या. जे पाणी पिण्यासाठी वापरले जाऊ शकते.