Manasvi Choudhary
घर खरेदी करताना किंवा नवीन बांधताना घराची डिझाईनच नाही तर त्यांच्या वास्तुशास्त्रातील नियमांकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.
वास्तुशास्त्रामध्ये, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विशेष महत्व दिले आहे. शास्त्रानुसार, घराचा मुख्य दरवाजा हा घरामध्ये सकारात्मक उर्जा आणण्याचे काम करते.
वास्तुशास्त्रानुसार, घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा उत्तर , पूर्व, ईशान्य किंवा पश्चिम दिशेला असणे अत्यंत शुभ मानले जाते.
ईशान्य दिशा धनाची देवता कुबेर देवांची दिशा मानली जाते. या दिशेला मुख्य दरवाजा असल्याने घरात संपत्ती, ऐश्वर्य आणि अफाट सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो.
पूर्व दिशा ही सूर्य उगवण्याची ही दिशा मानली जाते. पूर्व मुखी दरवाजा असल्यामुळे घरात नवीन संधी, प्रकाश येतो. ही दिशा प्रगतीची दिशा मानली जाते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.