Manasvi Choudhary
ड्रायफ्रुट्स आरोग्यासाठी सुपरफूड मानले जातात. काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड या ड्रायफ्रुट्समध्ये प्रथिने, हेल्दी फॅट्स, फायबर आणि जीवनसत्त्वे असतात.
मात्र डायबिटीजचे रूग्ण ड्रायफ्रुट्स खाऊ शकतात का? रक्तातील साखरेवर ड्रायफ्रुट्सचा काय परिणाम होतो? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
डायबिटीजचे रूग्ण ड्रायफ्रुट्स मर्यादित प्रमाणात खाऊ शकतात. मात्र कोणते ड्रायफ्रुट्स खाऊ शकतात त जाणून घ्या.
डायबिटीजच्या रुग्णांसाठी बदाम खाणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. बदामामध्ये मॅग्नेशियम आणि फायबर असते, जे शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते.
पिस्त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
काजूमध्ये कॅलरीज आणि फॅट्सअसते. त्यामुळे डायबिटीजच्या रुग्ण काजूचे सेवन करू शकता.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.