Manasvi Choudhary
आपल्यापैकी अनेकांना दुधाचा चहा पिण्याची सवय आहे. दुधाचा चहा हा प्रत्येकाच्या घरी बनवतात. तर अनेक फिटनेसप्रेमी वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पितात.
मात्र तुम्हाला माहितीये का? या दोघांपैकी कोणते ड्रिंक आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे?
दुधाच्या चहामुळे मनाला फ्रेश वाटते आणि शरीराला ऊर्जा मिळते यासाठी अनेकजण सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पितात.
मात्र दुधाच्या चहामध्ये साखर आणि दूध असल्यामुळे शरीरातील कॅलरीज वाढतात. तसेच दुधाचा चहा प्याल्याने ॲसिडिटी, अपचन किंवा पोट फुगण्याचा त्रास देखील होऊ शकतो.
ग्रीन टी मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात.
ग्रीन टी मुळे मेटाबॉलिज्म वाढतो आणि शरीरातील चरबी कमी होण्यास फायदा होतो यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी ग्रीन टी फायदेशीर मानली जाते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.