Shruti Vilas Kadam
पायांच्या नखांचा रंग पिवळा पडणे, नख जाड होणे किंवा ठिसूळ होणे यामागे फंगल इन्फेक्शन हे एक सामान्य कारण असू शकते.
पायाच्या नखाला इजा झाल्यास नखाखाली रक्त साचू शकते. त्यामुळे नखाचा रंग काळा, निळसर किंवा गडद दिसू शकतो.
सतत घट्ट किंवा चुकीच्या आकाराचे शूज घातल्यामुळे नखांवर दबाव पडतो. यामुळे नखाला दुखापत होऊन त्याचा रंग बदलू शकतो.
संसर्ग झाल्यास नखाचा रंग बदलण्यासोबत नख जाड होणे, तुटणे किंवा नखाभोवती सूज आणि वेदना जाणवू शकतात.
पाय आणि नखे नियमित स्वच्छ व कोरडी ठेवणे गरजेचे आहे. ओलावा जास्त काळ राहिल्यास फंगल इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो.
कोणतीही दुखापत न होता नख काळे पडणे किंवा रंगात सतत बदल होत राहणे याकडे दुर्लक्ष करू नये. अशावेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
नखांचा रंग बदलण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. त्यामुळे कारण समजून न घेता क्रीम किंवा औषधांचा वापर करण्याऐवजी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.