विकास काटे, साम टीव्ही प्रतिनिधी
ठाणे : मुंबईमधील घाटकोपर होर्डिंग कोसळण्याच्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ठाण्यातील बाळकूम या ठिकाणी राहणाऱ्या पूर्णेश जाधव यांचाही मृत्यू झालाय. ते खासगी चारचाकी वाहनाचे चालक होते. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. ते कारमध्ये सीएनजी भरण्यासाठी गेले असताना होर्डिंग पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पूर्णेश यांच्या मृत्यूनंतर शासनाने त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
घाटकोपर दुर्घटनेत ठाण्यातील बाळकूम या ठिकाणी राहणारे ४२ वर्षीय पूर्णेश जाधव यांचा मृत्यू झाला आहे. जाधव हे घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर सीएनजी भरताना होर्डिंग कोसळलं. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मुंबईच्या घाटकोपरमधील दुर्घटनेत ठाण्यातील जाधव कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचे साधन नाहीसं झालं आहे. घरातील कर्ते असणारे जाधव यांच्या मागे पत्नी, २ मुले आणि एक मुलगा असा परिवार आहे. या दुर्घटनेनंतर आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी जाधव कुटुंबीय करीत आहेत.
पूर्वेश हे ठाण्यातील बाळकूम येथील आंबेडकर नगर या ठिकाणी भाडेतत्वावर राहत होते. ते दुपारी नेहमी प्रमाणे खासगी गाडीवर चालक म्हणून निघाले होते. त्यावेळी त्यांचं पत्नी शालिनी जाधव यांच्याबरोबर बोलणं देखील झालं होतं. पाऊस जास्त असल्याने त्यांनी मुलांना घराच्या बाहेर काढू नको, असे सांगितलं होते.
पूर्वेश यांच्या पत्नी शालिनी जाधव म्हणाल्या की, घराबाहेर खूप पाऊस पडत आहे. मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नको. मी अर्धा तासाच्या आत येतो. मी वाट बघत बसले होते. त्यानंतर मालकांचाही फोन आला होता. त्यांनी अपघात झाल्याची माहिती दिली. त्यानंर मी माझ्या भावांना घेऊन रुग्णालयात गेले. त्यावेळी त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले होते. माझ्या घरात आता कमावणारं कोणी नाही. माझे लहान मुले शिक्षण घेत आहे. मला आता भरपाई हवी आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.