Dipesh mhatre saam tv
मुंबई/पुणे

Kalyan-Dombivali Politics : संपर्कमंत्र्यांच्या जनता दरबाराच्या आडून ठाकरे गटानं सोडला भाजपवर बाण!

Kalyan Dombivali News: मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ यांच्यातील वाद हा सर्वश्रुत आहे, काही दिवसापूर्वीच गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात जनता दरबार भरवल्याने पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली होती. यावरूनच ठाकरे गटाने यामध्ये आता एंट्री मारलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पालकमंत्रिपदावरून भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असतानाच, ज्या जिल्ह्यात पक्षाच्या नेत्याकडं पालकमंत्रिपद नाही, तिथं भाजपनं मंत्र्यांची संपर्कमंत्रिपदी निवड केली आहे. त्यानुसार ठाण्याची जबाबदारी गणेश नाईक यांच्याकडे दिली आहे. त्यांनी आता ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी जनता दरबार भरवण्यास सुरुवात केली आहे. पण याच जनता दरबाराच्या आडून ठाकरे गटानं कल्याण डोंबिवलीतील भाजप नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

आगामी काळात राज्यात महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यादृष्टीने प्रत्येक पक्षाने आपापल्या परीनं तयारी सुरू केली आहे. कल्याण -डोंबिवलीमध्ये आतापासूनच राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे कल्याण डोंबिवलीतील नेते दीपेश म्हात्रे यांनीही भाजपच्या स्थानिक नेत्यांना नाव न घेता लक्ष्य केलं आहे. भाजपनं ठाणे जिल्ह्याच्या संपर्कमंत्रिपदी गणेश नाईक यांची निवड केली आहे. त्यांनी ठिकठिकाणी जनता दरबार घ्यायला सुरुवात केली आहे. हेच निमित्त साधून दीपेश म्हात्रे यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे.

'गणेश नाईकांनी कल्याण-डोंबिवलीत जनता दरबार घ्यावा'

संपर्कमंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर गणेश नाईक अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी ठाण्यातील काही भागांत जनता दरबार घेण्यास सुरुवात केली आहे. यावरून दीपेश म्हात्रे यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर निशाणा साधला आहे. गणेश नाईक यांनी कल्याण-डोंबिवलीत जनता दरबार घ्यावा, म्हणजे भाजपच्या येथील सहकाऱ्यांनी शहराची किती वाट लावली आहे, हे त्यांच्या लक्षात येईल, असे दीपेश म्हात्रे म्हणाले.

...तर हॉल कमी पडेल!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि ठाकरे गट यांच्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ठाकरे गटाच्या दीपेश म्हात्रे यांनी येथील भाजपच्या स्थानिक नेत्यांवर नेम साधायला सुरुवात केली आहे. गणेश नाईकांनी कल्याण-डोंबिवलीत जनता दरबार घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. या ठिकाणी जनता दरबार घेतला तर हॉल कमी पडेल इतके प्रश्न या शहरात आहेत. तुमच्या पक्षाच्या सहकाऱ्यांनी शहराचे काय आणि किती नुकसान केले आहे, हे त्यांना कळेल, असा टोलाही दीपेश म्हात्रे यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trump Putin Summit : भारतावरचा टॅरिफ रद्द होणार? ट्रम्प-पुतीन भेटीत काय घडलं?

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवात ७५ गोविंदा जखमी, काहींची प्रकृती गंभीर, एकाचा मृत्यू

Dog Bite: दिसेल त्याचे तोडले लचके;इंदापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ,सीसीटीव्हीत घटना कैद

Maharashtra Politics : ठाण्याच्या वर्चस्वावरुन महायुतीत मतभेद, एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात पुन्हा संघर्ष

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात फक्त मराठी चालणार; मुंबईत दहीहंडी उत्सवात मनसेचे बॅनर झळकले

SCROLL FOR NEXT