Aditya Thackeray saam tv
मुंबई/पुणे

Thackeray Group Morcha on BMC : ठाकरे गटाने सुचवलेल्या दुसऱ्या मार्गाला तरी परवानगी मिळणार का? गृहविभाग उद्यापर्यंत निर्णय घेणार

Mumbai Political News : मेट्रो सिनेमा ते टाइम्स ऑफ इंडिया इमारत असा पहिला मोर्चाचा मार्ग द्यावा, असं पत्र ठाकरे गटाने पोलिसांना दिलं होतं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निवृत्ती बाबर

Mumbai News : शिवसेना ठाकरे गट आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेवर 1 जुलै रोजी भव्य मोर्चा काढणार आहे. मात्र या मोर्चाचा मार्गांवरबाबत मुंबई पोलिसांकडून अंतिम परवानगी मिळालेली नाही. मोर्चाला परवानगी मिळावी यासाठी ठाकरे गटाने मुंबई पोलिसांना पत्र दिलं आहे.यावर उद्यापर्यंत गृहविभाग निर्णय घेणार आहे.

मेट्रो सिनेमा ते टाइम्स ऑफ इंडिया इमारत असा पहिला मोर्चाचा मार्ग द्यावा, असं पत्र ठाकरे गटाने पोलिसांना दिलं होतं. तो मार्ग कायदा सु्वेस्थेच्या प्रश्नावरून देण्यास अडथळे होते. त्यानंतर पोलिस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांच्या चर्चेनंतर मोर्चाचा मार्ग बदलण्यात आला आहे. (Latest Marathi News)

तात्काळ दुसऱ्या मार्गाची पाहणी ठाकरे गटाच्या नेत्यांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी केली. हा मार्ग मेट्रो सिनेमा ते थेट महानगरपालिकेच्या इमारतीपर्यंत असेल. मुंबई महानगरपालिका गेट नंबर 2 च्या बाजूच्या रस्त्याला स्टेज असेल आणि याठिकाणी नेत्यांची भाषणं होतील.

या मार्गाची पाहणी करताना स्वतः पोलीस अधिकारी आणि ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते. त्यामुळे या मार्गाला परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

मोर्चा कशासाठी?

ठाकरे गटाने मोर्चासाठी सर्व तयारी सुरु केली आहे. तसेच या मोर्चाचा टीझरही पक्षाने रिलीज केला आहे. सध्या मुंबईला कोणी मायबाप नाही. मुंबई महापालिकेच्या तिजोरीत जवळपास ९० हजार कोटींच्या ठेवी होत्या. मात्र मुंबईकरांच्या या पैशांची लूट सुरु असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा असेल असेही ठाकरे गटाने स्पष्ट केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईच्या साकीनाका पोलिसांची मोठी कारवाई

Politics: महायुतीत धुसफूस! भाजपकडून शिंदेंच्या नेत्यांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; फोडाफोडीचं राजकारण सुरू

Operation Mahadev : ऑपरेशन महादेव हे नाव कसं पडलं? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Shani Shingnapur News : शनी शिंगणापूर देवस्थानच्या माजी विश्वस्तांची आत्महत्या; पोलिसांनी केला मोठा खुलासा

Death : शटलकॉक घ्यायला गेला अन् खाली कोसळला, बॅडमिंटन खेळताना २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT