Uddhav Thackeray On Shinde Group Saam Tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray On Shinde Group: 'माझं सरकार वाहून गेलं नाही, खेकड्यांनी धरण फोडलं', उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर सडकून टीका

Priya More

Uddhav Thackeray Saamana Interview: शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीतून शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या गटावर जोरदार निशाणा साधला आहे. 'माझ्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेलं नाही. खेकड्यांनी धरण फोडलं.', अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला अनेक सवाल देखील केले आहेत.

'हे ट्रिपल इंजिन की डालड्याचा डबा?', अशा शब्दात त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला सवाल केला आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आवाज कुणाचा पॉडकास्टमधून उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झाला. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटावर टीका केली आहे. 'गेल्यावर्षी मुसळधार पावसात माझ्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेलं नाही. खेकड्यांनी धरण फोडलं. ते धरणातच बसले होते. मातीमध्ये… शेवटी खेकडा हा खेकडाच असतो. त्याला कितीही सरळ चालवण्याचा प्रयत्न केला तरी तो तिरकाच चालतो.'अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर घणाघात केला आहे.

'खेकड्यांची एक मानसिकता असते. ज्या टोपलीत खेकडे असतात त्या टोपलीवर झाकण ठेवण्याची गरज नसते. एखादा खेकडा वर जायला गेला की बाकीचे त्याला खाली खेचतात. तसेच हेही खेकडेच आहेत.', अशी देखील टीका उद्धव ठाकरे यांनी केली. त्याचसोबत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना बांडगुळ म्हणत त्यांच्यावर सडकून टीक केली आहे. 'काही वेळा आपली फसगत होते. ज्यांना आपण आपलं मानतो ती बांडगुळं निघतात. तरी देखील ती आपल्यासोबत आहेत असं आपल्याला वाटत राहतं. पण प्रत्यक्षात ती त्या फांदीवरती मूळ वृक्षाचा रस शोषत असतात. वृक्षाला वाटतं हे आपल्याच सोबत आहेत.' असं देखील उद्धव ठाकरेंनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले की, 'मला जे करायचं होतं ते मी केलं. सध्याचे चित्र तुम्ही म्हणताय ते पाहिलं तर या पद्धतीने मी सत्ता राबवू इच्छित नाही आणि माझ्याकडून ती तशी राबवली पण जाणार नाही. जर मला सत्ता टिकवायची असती तर जे गद्दार होते ते गद्दारी करण्यापूर्वी माझ्यासोबतच दोन-तीन दिवस होते. त्यांना हॉटेलमध्ये किंवा इतरत्र डांबून ठेवू शकलो असतो. पण असं किती दिवस डांबून ठेवणार. जी मनानेच विकली गेली आहेत ती माणसं मला नकोच आहेत. जी माझ्या सभोवती अगदी मूठभर का असतील, पण निष्ठावान असतील अशीच माणसं मला हवीत.', असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT