Sanjay Raut News
Sanjay Raut News SAAM TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut On BJP: 'कमळाच्या पाकळ्या गळून पडल्या, ते वाचवता आलं नाही', संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

Priya More

Mumbai News: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Election) काँग्रेसने (Congress) भाजपचा दारुण पराभव केला. या पराभवावरुन संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. 'कमळाच्या पाकळ्या आता गळून पडल्या, ते तुम्हाला वाचवता आलं नाही', अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजवर टीका केली आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना संजय राऊतांनी हे वक्तव्य केले आहे.

संजय राऊत यांनी सांगितले की, 'नक्कीच देशभरात लोटस ऑपरेशन करतात. हे जे लोटस होतं त्याच्या पाकळ्या गळून पडल्यात. ते तुम्हाला वाचवता आलं नाही. कर्नाटकच्या जनतेने शार्टपणे घेतलेला हा निर्णय आहे. भारतीय जनता पक्षाला पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण यंत्रणा लावूनसुद्धा 70 जागा मिळवता आल्या नाही.', अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली. तसंच, 'ज्या काँग्रेसला तुम्ही कचरा पप्पू बोलत होते. त्या काँग्रेसच्या पाठीमागे कर्नाटकची जनता उभी राहिली.' असा देखील टोला त्यांनी लगावला.

आगामी महापालिका निवडणुकीवरुन देखील संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, 'या सरकारमध्ये लोकांना सामोरे जायची हिंमत असेल. मुख्यमंत्र्यांमध्ये, उपमुख्यमंत्र्यांमध्ये आणि केंद्र सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे, नागपूर, नाशिक, संभाजीनगर अशा 14 महानगरपालिकांच्या निवडणुका तुंबवून ठेवलेल्या आहेत त्या घ्याव्यात. आमची तयारी आहे. कधीही घ्या निवडणुका. पण तुमची हिंमत नाही.'

संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, 'यांना कोणत्याही निवडणुका यापुढे देशात घ्यायचा नाहीत. कर्नाटकच्या निकालानंतर त्यांना जो हादरा बसलेला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने देशांमध्ये हुकूमशाही सुरू होईल का? अशाप्रकारे आम्हाला वाटतं. महानगरपालिकापासून विधानसभा, लोकसभा या निवडणुका पुढे ढकलत राहायचं.' तसंच, 'कर्नाटकमध्ये जरी भाजपचा पराभव झाला असला तरी ईव्हीएमविषयी आमची भूमिका कायम आहे. बॅलेट पेपर मतपत्रिका हाच लोकशाहीचा सगळ्यात मोठा मार्ग आहे.', असे देखील त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

SCROLL FOR NEXT