Versova–Bandra Sea Link: वांद्रे-वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव द्यावे...; फडवीसांची मागणी पूर्ण होणार का?

वांद्रे-वर्सोवा सीलिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Saam TV

निवृत्ती बाबर

Devendra Fadnavis News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोस्टल रोड नामकरणाची मागाणी पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता वांद्रे-वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांची ही मागणी केव्हा पूर्ण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. (Latest Political News)

देवेंद्र फडणवीस यांची मागणी पूर्ण होणार का?

सावरकरांच्या मुद्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये या आधी अनेक वाद झाले आहेत. हे वाद सुरू असताना आता वांद्रे- वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याची मागणी केल्याने वाद आणखीन निर्माण होऊ शकतो असं म्हटलं जात आहे.

Devendra Fadnavis
Uttarakhand Crime News: एकाच कुटुंबातील चौघांना संपवलं; घटनेने परिसरात खळबळ, पोलिसही हादरले

दरम्यान, मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (एमटीएचएल) भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे अशीही मागणी फडणवीसांनी केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून आधीच भाजप आणि काँग्रेस आमने सामने असताना आता पुन्हा एकदा सावरकरांचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

वांद्रे-वर्सोवा सीलिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे. कोस्टल रोडला "छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड" असं नाव देणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

Devendra Fadnavis
Nalasopara Crime News: गटारात सापडला महिलेचा मृतदेह; नालासोपारामधील खळबळजनक घटना

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी १३ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी कोस्टल रोड, वांद्रे- वर्सोवा सिलिंक (Bandra Versova Sea Link) आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला नवीन नावे देण्यात यावी अशी विनंती केली होती. त्यापैकी कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज हे नाव देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आणखी दोन मागण्या पूर्ण होतात का? हे पहावं लागणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com