Uttarakhand Crime News: एकाच कुटुंबातील चौघांना संपवलं; घटनेने परिसरात खळबळ, पोलिसही हादरले

उत्तराखंडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तराखंडमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Uttarakhand Crime News
Uttarakhand Crime NewsSaam Tv

Uttarakhand Crime News: उत्तराखंडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तराखंडमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. (Latest Marathi News)

उत्तराखंडमधील पिथौरागड जिल्ह्यातील बरसम गावात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या झाल्याची घटना घडली आहे. हत्या झालेल्या सर्वच महिला असल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबातील सदस्याने त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुटुंबातील चार महिलांची हत्या केल्यानंतर आरोपी संतोष फरार झाला आहे. पोलिसांनी आरोपी संतोषचा शोध सुरू केला आहे.

Uttarakhand Crime News
Tamilnadu News: दारु जिवावर बेतली! ३ महिलांसह १० जणांचा मृत्यू; तामिळनाडूमधील घटनेने खळबळ

उत्तराखंडमधील ही घटना नेपाळला जाण्याऱ्या सीमेवर घडली आहे. यामुळे पोलिसांकडून आरोपीला शोधण्यासाठी ड्रोनचीही मदत घेतली जात आहे. आरोपी संतोषने घरातील पत्नी, सासू, चुलत वहिनी आणि चुलत बहिणीचा धारदार शस्त्राने गळा आवळून हत्या केली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

या क्रूर प्रकार केल्यानंतर संतोषची मुलगी जोरजोरात ओरडू लागली. त्यानंतर संतोष घरातून तातडीने पळून गेला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. तर आरोपी संतोविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Uttarakhand Crime News
Chhattisgarh Accident News: राष्ट्रीय महामार्गवर ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात; ६ जणांचा जागीच मृत्यू

आरोपी संतोषने धक्कादायक कृत्य केल्यानंतर त्याची मुलगी जोरजोरात ओरडू लागली. त्यानंतर गावातील मंडळी मुलगी का रडतेय हे पाहण्यासाठी घराजवळ पोहोचले. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार लोकांना समजला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com