Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: मातोश्रीबाहेर आंदोलन करणारी मुख्यमंत्र्यांची माणसं; संजय राऊतांनी फोटो दाखवले, नावंही खडाखड वाचली

Sanjay Raut Allegations On CM Eknath Shinde Over Protest On Matoshree : मातोश्रीबाहेर आंदोलन करणारी मुख्यमंत्र्यांची माणसं होती, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी फोटो देखील दाखवले आहेत.

Rohini Gudaghe

संजय राऊत, साम टीव्ही मुंबई

मुंबईमध्ये सुपारीचं काम जास्त चालतंय, हे काम दिल्लीमधून होतंय. मातोश्रीवर जे आंदोलन झालं, ते खास सुपारी देऊन पाठवलेले लोक होते, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केलाय. मातोश्रीबाहेर आंदोलन झालं होतं, ते सर्व लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोक होते. मातोश्रीबाहेर वक्फ बोर्डाच्या बिलाच्या निमित्ताने दहा-वीस लोक आले अन् घोषणाबाजी करून गेले. काहीही कारण नव्हतं, अजून या बिलावर संसदेत चर्चा व्हायची आहे. पण दरम्यान मातोश्रीवर आंदोलन झालं.

संजय राऊत यांचा आरोप

मातोश्रीच्या बाहेर १० ते १२ लोक आलेले होते. ते लोक कोणी पाठवलेले होते? ती सुपारी कोणाची होती? याचे सर्व पुरावे आहेत. आमच्या विरोधात नारेबाजी करणारे लोक वर्षावर राहणारे (Maharashtra Politics) होते. त्या लोकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलं होतं, असं म्हणत संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत फोटो दाखवले आहेत. पुरावे दाखवत संजय राऊत यांनी अकबर सय्यद, सलमान शेख, अफराफ सिद्धिकी, अक्रम शेख हे यांचे फोटो दाखवले आहेत.

मातोश्रीबाहेर आंदोलन

या फोटोंमध्ये ही लोक नरेश म्हस्के, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी , तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत दिसत आहेत. ठाण्यात जे झालंय, त्या लोकांना देखील सुपारी दिलेली होती, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. वर्फ बोर्ड हे विधायक चर्चेसाठी गेलेले आहे. चर्चा होईल, पण त्याअगोदर महाराष्ट्रामधील वातावरण खराब करण्यासाठी काही मुस्लिम व्यक्ती मातोश्रीवर पाठवले होते. मातोश्रीच्या बाहेर आंदोलन केलेले सर्व लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी (Thackeray Group) केलंय.

लोकांना सुपारी देवून आणलं

काळोखात ठाण्यात ताफ्यावर हल्ला केला, त्यातील एकही व्यक्ती ठाण्यातील नव्हता. सर्व लोकांना सुपारी देवून आणलेलं होतं. तुमच्या हातात सत्ता आहे, म्हणून तुम्ही हे करत आहात, असा घणाघात संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर (Uddhav Thackeray Matoshree Bungalow Protest) केलाय. २ महिन्यात सत्ता आमच्याकडे येईल, असा दावा देखील संजय राऊत यांनी केलाय. दरम्यान संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडालीय. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हरणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

Sunil Tatkare: खरी राष्ट्रवादी कोणती? अखेर जनतेनं उत्तर दिलचं, सुनिल तटकरेची प्रतिक्रिया

Vidhan Sabha Election Result : अकोल्यात बंडखोरीचा भाजपला फटका; काँग्रेसचे साजिद खान पठाण विजयी

Nanded News : नांदेडमध्ये मतमोजणीदरम्यान दोन गटात तूफान राडा

SCROLL FOR NEXT