Shiv Sena Vs MNS Rada  Saam Tv
मुंबई/पुणे

Shiv Sena Vs MNS Rada : मर्द असाल तर समोर या, पळून का गेलात? ठाण्यातील राड्यानंतर राजन विचारे संतापले

Rajan Vichare Reaction Over MNS Rada In Udhhav Thackeray Melava : ठाण्यामध्ये काल उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी राडा केल्याचं समोर आलं. यावर ठाकरे गटाचे नेते राजन विचारे आक्रमक झाल्याचं दिसत आहे.

Rohini Gudaghe

विकास काटे, साम टिव्ही मुंबई

राज्यात विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी काल ठाण्यात ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. परंतु या मेळाव्यात राज ठाकरे यांच्या समर्थकांनी जोरदार राडा केल्याचं दिसलं. उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेण फेकलं. मोठा पोलीस बंदोबस्त असताना देखील त्यांनी मोठा गोंधळ घातला. यावरून आता ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी मनसे कार्यकर्त्यांवर हल्लाबोल केलाय. मर्द असाल तर समोर या, पळून का गेलात? ठाण्यातील राड्यानंतर राजन विचारे यांनी संतापजनक सवाल विचारला आहे.

ठाण्यातील राड्यानंतर राजन विचारेंची प्रतिक्रिया

माध्यमांशी बोलताना राजन विचारे म्हणाले की, आज महिलांना पुढे करून जो प्रकार घडला, तो अतिशय निंदनीय आहे. बीडला झालेल्या घटनेचं समर्थन नव्हतंच, असं देखील त्यांनी (Rajan Vichare)म्हटलंय. मर्द असाल तर समोर या, दम असेल तर तुम्ही पळून का गेलात? आज आमचा कार्यक्रम होता म्हणून शांत होतो. उद्धव ठाकरे यांचा इतिहास मोठा आहे. विरोधक प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करत असल्याची टीका राजन विचारे यांनी (Udhhav Thackeray Melava Thane) केलीय.

शिवसैनिकांमध्ये संतापाचं वातावरण

सभागृहातील दीड दोन हजार पब्लिक खाली आली असती, तर आणखी वेगळा प्रकार घडला असता असा इशारा देखील राजन विचारे यांनी दिला. मुंबईवरून गाडीत बसून, लपून छपून बाईट दिला. अरे काय तुझं, हे करू ते करू अशी भाषा वापरत आहेत. शिवसैनिकाला अशी भाषा वापरू नका, शिवसैनिक कधीही अंगावर यायला तयार असतात, अशी आक्रमक भूमिका देखील राजन विचारे यांनी घेतली आहे. काल ठाण्यातील मेळाव्यात घडलेल्या प्रकारानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाचं वातावरण ( MNS Rada In Udhhav Thackeray Melava Thane) आहे.

उद्धव ठाकरेंचा मेळावा

लहान मुलं देखील नारळ मारून पळून जातात, ही मर्दाची लक्षणे नाहीत, अशी परखड टीका त्यांनी केलीय. तर अविनाश जाधवने घडलेल्या प्रकारामागे त्याचाच हात असल्याचं कबूल (Maharashtra Politics) केलंय. तर पोलिसांकडे त्याचं फुटेज आहे. शिवसैनिकांनी संयम पाळल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. बॅनर लाऊन काही होत नाही, कामे करावी लागतात, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. काल मुख्यमंत्री खड्डे पाहायला आले होते. फॉरेनची टेक्निक आणली. मात्र ते तुमचे मित्रच करत आहेत. लोकांना भडकवणे बंद करावे, असंही राजन विचारे म्हणाले आहेत. तर मानपाडामध्ये ड्रग्स विकला जात असल्याचा गंभीर दावा देखील त्यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT