रूपाली बडवे, साम टीव्ही मुंबई
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगलेली आहे, दरम्यान शिंदे आणि ठाकरे गटात तुफान राडा झाल्याचं समोर आलंय. मुंबईतील प्रभादेवीत शिंदे गट - ठाकरे गट आमने सामने आले होते. यावेळी दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याची माहिती मिळत आहे. नेमकं कोणत्या कारणामुळे हा राडा झाला, याबद्दल आपण सविस्तर जाणून घेवू या.
ठाकरे अन् शिंदे गटात राडा
मुंबईतील प्रभादेवी परिसरात रस्त्यावर शिवसेना पक्षाचे काही होर्डिंग लावण्यात आले होते. या होर्डिंगवर धनुष्यबाण चिन्ह होतं. परंतु ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हे चिन्ह होर्डिंगवरून कापून हटवले, शिंदे गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले अन् मोठा वाद पेटला. रस्त्याच्या होर्डिंगवरील धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळेस काढल्याने स्थानिक शिवसैनिक आक्रमक झाले (Shinde Group Vs Thackeray Group) होते.
धनुष्यबाण चिन्ह हटवल्यामुळे पदाधिकारी भिडले
फूटपाथवरील हे बोर्ड स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या स्वखर्चातून बसवण्यात आल्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी (Mumbai News) केलाय. मात्र, सत्तांतरानंतर त्यावर इतर राजकिय पक्षाचे (ठाकरे गट) चे पदाधिकारी होर्डिंग लावत होते. यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीही आक्षेप घेतला होता. स्थानिक पोलिसांना पत्र व्यवहार करत ही बाब निदर्शनास आणून दिली होती. आता होर्डिंगवरील चिन्ह काढत असताना प्रभादेवीमध्ये ठाकरे (Udhhav Thackeray) आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळतंय.
गुन्हा दाखल
दरम्यान, मंगळवारी रात्री उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यरात्री ११ वाजेच्या सुमारास आहुजा टॅावर येथील शिवसेना पक्षाच्या होर्डिंगवरील धनुष्यबाण हे चिन्ह कापून तेथून हटवले. होर्डिंगवरील हे चिन्ह काढत असताना शिंदेच्या (Eknath Shinde) शिवसैनिकांनी ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झालाय. शिवसेनेचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर माहिम पोलीस ठाण्यात ठाकरे गटाचे पदाधिकारी शैलेश माळी, अमर लब्देसह अन्य एकावर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.