Neelam Gorhe Joined Shinde Group Saam Tv
मुंबई/पुणे

Neelam Gorhe Joined Shinde Group: ठाकरे गटाला मोठा धक्का! नीलम गोऱ्हेंनी सोडली साथ, शिंदे गटात प्रवेश

Cm Eknath Shinde: नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटामध्ये (Eknath Shinde Group) प्रवेश केला आहे.

Priya More

Mumbai News: ठाकरे गटाला (Thackeray Group) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे.

नीलम गोऱ्हे यांनी आज ठाकरे गटाची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटामध्ये (Eknath Shinde Group) प्रवेश केला आहे. नीलम गोऱ्हे या उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या आणि विश्वासू म्हणून ओळखल्या जायच्या. मात्र ठाकरेंच्या अडचणीच्या काळात नीलम गोऱ्हे यांनी साथ सोडल्याने अनेकांनी भुवया उंचावलेल्या आहेत.

शिवसेनेच्या रणरागिनी नीलम गोऱ्हे या पीडित महिलांचा आवाज आणि ठाकरे गटाची बाजू अभ्यासू आणि खंबीरपणे मांडायच्या. नीलम गोऱ्हे या ठाकरे गटातील महत्वाच्या नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. नीलम गोऱ्हे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सकाळपासून सुरु होती. अखेर त्यांनी आज शिंदे गटामध्ये प्रवेश केला. नीलम गोऱ्हे यांचा शिंदे गटातील प्रवेश हा उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड केल्यानंतर ठाकरे गटातील एकापाठोपाठ एक महत्वाचे नेते शिंदे गटामध्ये दाखल होत आहेत. दीपाली सय्यद, मनिषा कायंदे यांच्यानंतर ठाकरे गटातील महत्वाच्या आणि मोठ्या नेत्या म्हणून ओळख असलेल्या नीलम गोऱ्हे यांनी देखील ठाकरे गटाची साथ सोडली. आता नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश करणे हा देखील ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. कारण नीलम गोऱ्हे या फक्त विधान परिषदेच्या आमदार नव्हत्या तर त्या विधान परिषदेच्या उपसभापती देखील आहेत.

नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेना योग्य मार्गावर आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार देखील शिंदेंचीचं शिवसेना अधिकृत असल्याचे स्पष्ट झालंय. विकासासाठी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.' नीलम गोऱ्हे यांनी २२ फेब्रुवारी १९९८ रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत त्या अत्यंत संयमाने, नेटाने आणि अभ्यासू वृत्तीने शिवसेनेची बाजू मांडत होत्या.

एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून नीलम गोऱ्हेंकडे बघितलं जातं होतं. त्या ठाकरे गटामध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज होत्या असे देखील सांगितले जात आहे. ठाकरे गटामध्ये सुषमा अंधारे यांनी प्रवेश केल्यानंतर अनेक नेते नाराज होत्या. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर अनेक नेत्यांनी याचे खापर खासदार संजय राऊतांवर फोडले होते. आता ठाकरे गटातील महिला नेत्या सोडून जाण्याचे सर्व खापर सुषमा अंधारेंवर फोडले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : - सह्याद्रीत मुसळधार पावसामुळे घोड नदीला पूर

Bus Accident : बस- ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पारोळा- भडगाव रस्त्यावरील घटना

Shocking : मिठाईचं आमिष दाखवतं झुडपात नेलं; अंगणवाडीत गेलेल्या ५ वर्षीय चिमुकलीवर १५ वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार

Jui Gadkari: जुई गडकरीचा मराठमोळा अंदाज; फोटो पाहून सौंदर्याचं कौतुक

Indian Railway: आता मोठं बिऱ्हाड ट्रेननं नेता येणार नाही; विमान प्रवासाचा नियम रेल्वेमध्ये होणार लागू, वाचा काय आहे कारण

SCROLL FOR NEXT