Thackeray Vs Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Thackeray Vs Shinde : दसरा मेळाव्याआधीच शिंदे - ठाकरे गट आमनेसामने! कल्याणमध्ये घडला धक्कादायक प्रकार

Kalyan Politics: ठाकरे गटाचे दसरा मेळाव्यासाठी कल्याणमध्ये लावलेला बॅनर अज्ञातांनी फाडल्याची घटना घडली आहे.

Saam Tv

अभिजित देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

वर्षभर शिवसैनिक ज्याची वाट पाहतो त्या दसरा मेळाव्याआधीच कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार साईनाथ तारे यांनी दसरा मेळाव्यासाठी सहभागी होण्यासाठी बॅनर शहरात ठिकठिकाणी लावले आहेत.

यापैकी दुर्गाडी चौकात त्यांनी लावलेले भले मोठे बॅनर अज्ञाताने फाडल्याची घटना आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी तारे यांनी विरोधकांनी आपला धक्का घेतल्याने यासारखे घाणेरडे राजकरण सुरू केले असून अशामुळे निवडणुका जिंकता येणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी नाव न घेता शिंदे गटावर बॅनर फाडल्याचा आरोप केला आहे.

आठवडाभपरसाईनाथ तारे यांनी शिंदे गटातून ठाकरे गटात प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साईनाथ तारे यांच्या नावाची चर्चा शहरात सुरू आहे. तारे यांनी दुर्गाडी चौकात शिवसेनेच्या शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन करणारे बॅनर लावले होते.

हे बॅनर दुपारच्या सुमारास फाडल्याची टाकल्याची घटना घडली आहे. याबाबत तारे यांनी दुर्गाडी चौकात मी दसरा मेळाव्याचे जाहिरात करणारे अधिकृत बॅनर लावले होते. विरोधकांनी इतका धसका घेतला आहे की, त्यांनी बॅनरच पाडले आहे. इतक्या घाणेरड्या प्रकारचे राजकारण केले जाऊ नये. विकृत विचार बुद्धीच्या लोकांनी हा जो प्रकार केला आहे, तो निंदनीय आहे. या गोष्टीची मी निंदा करतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

Pawar vs Pawar: पवार कधीच एक होणार नाहीत? वैयक्तिक नव्हे वैचारिक मतभेद: शरद पवार

Horoscope: काही राशींना लागेल लॉटरी तर काहींची होईल खटपट; जाणून घ्या कसा असेल शुक्रवारचा दिवस

SCROLL FOR NEXT