Sayaji Shinde Join NCP: अभिनेते सयाजी शिंदे विधानसभेच्या रिंगणात? अजित पवार गटात केला प्रवेश

Sayaji Shinde News: अभिनेते सयाजी शिंदे यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
अभिनेते सयाजी शिंदे विधानसभेच्या रिंगणात? अजित पवार गटात केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCPSaam Tv
Published On

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणता मोठा अभिनेता प्रवेश करणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. या चर्चेवरील पडदा संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत उघडला.

मराठी नाट्य, मराठी चित्रपट, बॉलीवूड ते टॉलीवूडमध्ये विविधरंगी भूमिका साकारून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे आणि सामाजिक, पर्यावरण क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणारे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकारणातही ग्रँड एन्ट्री केली.

अभिनेते सयाजी शिंदे विधानसभेच्या रिंगणात? अजित पवार गटात केला प्रवेश
Ajit Pawar: अजित पवार कॅबिनेट मिटिंगमधून बाहेर का पडले? खुद्द पवारांनी सांगितलं नेमकं कारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत सयाजी शिंदे यांनी पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत ते राज्यात स्टार प्रचारक म्हणून काम करतील. पक्षात त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, असा शब्द स्वतः अजित पवार यांनी व्यासपीठावरून दिला. अजित पवार गटात सयाजी शिंदे यांनी प्रवेश केल्यानंतर आता ते विधानसभेच्या रिंगणात उतरणार, अशीही चर्चा होत आहे.

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे म्हणाले आहेत की, ''अजून मी नेता- पुढारी झालो नाही. त्यामुळे मला प्रोटोकॅाल माहिती नाही. मी अनेक नेत्यांच्या भूमिका केल्या आहेत. पण राजकारणात येईल, असा कधी विचार केला नव्हता. मंत्रालयात मी २५ वेळा गेलो, तर १५ वेळा दादांनाच भेटलो.''

अभिनेते सयाजी शिंदे विधानसभेच्या रिंगणात? अजित पवार गटात केला प्रवेश
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' अर्जाची मुदत वाढवली, आता कधीपर्यंत आणि कुठे भरता येणार अर्ज? जाणून घ्या

ते पुढे म्हणाले, ''दादांनी भेटणं म्हणजे पहाटे ६ आणि ७ वाजता भेटणं. मागच्या ८ दिवसांत हा निर्णय झाला. काही विषय सिस्टिममध्ये राहून लवकर मार्गी लावता येतील. सिस्टिममधून काम झालं तर मोठ्या संख्येने झाडे लागतील. या पक्षाच नियोजन आणि काम मला आवडतं. शेतकऱ्यांच्या योजनांसंदर्भात पक्ष चांगला निर्णय घेतो, असं मला वाटतं.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com