Devendra Fadnavis Latest Marathi News Saam TV
मुंबई/पुणे

ठाकरे सरकारकडे बहुमत नाही, त्यांनी ते सिद्ध करावं - देवेंद्र फडणवीस

राज्य सरकाकडे बहूमत नसून त्यांना आपलं बहूमत सिद्ध करायला सांगाव अशी विनंती करणार पत्र राज्यपालांना दिलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितंल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आज रात्री उशिरा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि प्रवीण देरेकर यांच्यासह राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांची भेट घेऊन बाहेर आल्यावर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी फडणवीस (Devandra Fadnavis) म्हणाले, ' आज आम्ही राज्यपालांना एनडीएद्वारे एक पत्र दिलं आहे. या पत्रामध्ये राज्यातील सध्याची परिस्थिती आहे, ज्या बातम्या आम्हाला पाहायला मिळत आहेत त्यानुसार शिवसेनेचे ३९ आमदार बाहेर आहेत.

काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर (NCP) आम्हाला सरकारमध्ये राहायचं नाही असं ते आमदार म्हणत आहेत. अशा परिस्थित राज्य सरकाकडे बहूमत नसून त्यांना आपलं बहूमत सिद्ध करायला सांगाव अशी विनंती करणार पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (BhagatSingh Koshyari) यांना दिलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितंल.

शिवाय या पत्रासोबत आम्ही सर्वाच्च न्यायालायाने दिलेल्या काही निर्णयांचा उल्लेख केलेले संदर्भ दिले आहेत. त्या निर्णयानुसार राज्यापाल योग्य निर्णय घेतील असा आपणाला विश्वास आहे. तसंच ई-मेलद्वारे देखील आपण राज्यापालांना पत्र दिलं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितंल.\

त्यामुळे आता राज्यपाल विशेष अधिवेशन बोलवणार का आणि ते कधी? याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. शिवाय येत्या ३० जूनलाच हे विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sheikh Hasina: माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशी, बांग्लादेशमधील हिंसाचाराचा ठपका

Maharashtra Live News Update: नांदेडच्या हदगाव नगरपरिषद निवडणूकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र

Baba Vanga Gold Prediction : पुढच्या वर्षी सोनं स्वस्त होणार की महागणार? बाबा वेंगा यांची मोठी भविष्यवाणी

Pickle Storage Tips: हिवाळ्यात लोणचे खराब होऊ नये म्हणून कसे साठवावे? ही सोपी पद्धत नक्की फॉलो करा

Maharashtra Politics: शेवटच्या क्षणी अजितदादांनी उघडला पत्ता; बारामतीत नगराध्यक्षपदासाठी उतरवला तगडा उमेदवार|VIDEO

SCROLL FOR NEXT