Raj-Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Raj-Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे पहिल्यांदाच 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरेंच्या घरच्या गणरायाचं घेतलं सहकुटुंब दर्शन; पाहा VIDEO

Maharashtra Politics: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी उद्धव ठाकरे हे सहकुटुंब आले आहेत. राज ठाकरे यांच्या घरच्या बाप्पाचे उद्धव ठाकरे दर्शन घेणार आहे. गणेशोत्सवानिमित्त ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले आहेत.

Priya More

Summary -

  • उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या घरी आले.

  • राज ठाकरे यांच्या घरच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.

  • ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा पुन्हा रंगली.

  • स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व.

राज्याच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीबाबत. दोघे भाऊ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकत्र येणार असल्याचे म्हटले जात आहे. दोन्ही भावांच्या भेटीगाठी देखील वाढल्या आहेत. अशामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना घरच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर आज उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत.

गणपती बाप्पाने दोन्ही भावांना एकत्र आणले असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय पहिल्यांदाच आले आहेत. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या राज ठाकरेंच्या कुटुंबीयांनी स्वागत केले. यावेळी बाप्पाचे दर्शन घेऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काही वेळ गप्पा देखील झाल्या. या दोन्ही कुटुंबीयांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. उद्धव ठाकरे हे आज दुपारी राज ठाकरे यांच्या घरीच जेवण करणार आहेत.

राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसांचा गणपती असतो. या गणेशोत्सवानिमित्त शिवतीर्थावर जोरदार तयारी करण्यात आली होती. राज ठाकरे यांनी स्वत: फोन करून उद्धव ठाकरे यांना गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी सहकुटुंब यावे यासाठी फोन केला होता. गणेशोत्सवात दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र आल्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसामित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी गूड न्यूज! जुनी पेन्शन संदर्भात मोठा निर्णय, कुणाला होणार लागू? वाचा सविस्तर

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

Lakshmi Niwas: 'लक्ष्मी निवास'मध्ये मोठा ट्विस्ट! लक्ष्मी-श्रीनिवासचे घराचे स्वप्न पूर्ण; तर जयंतचा होणार अखेर पर्दाफाश

Weekly Insulin: भारतात नवं इन्सुलिन लाँच! रोज नाही तर आठवड्यातून एकदाच घ्या इंजेक्शन, किंमत किती?

पावसाळ्याचा फिरायला जायचा प्लॅन करताय? पण, मुंबई-पुण्याजवळील 'ही' प्रसिद्ध पर्यटनस्थळे ३१ ऑगस्टपर्यंत राहणार बंद

SCROLL FOR NEXT