Thackeray-BJP Clash 
मुंबई/पुणे

BMC Election: ठाकरे-भाजपमध्ये हनुमानवरून युद्ध; मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी हिंदुत्वावरून लढाई

Thackeray-BJP Clash: मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप आणि ठाकरे गट आमने-सामने आलेत. त्याला कारण ठरलंय दादरच्या हनुमान मंदिराला रेल्वेने दिलेली नोटीस. ही नोटीस आल्यानंतर हिंदुत्वावरून नवा वाद पेटलाय.. याच वादावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईत पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि भाजपात युद्ध सुरू झालंय. त्याला कारण ठरलीय रेल्वेने दादरच्या 80 वर्षापुर्वीचं मंदिर हटवण्याची दिलेली नोटीस. त्यावरून ठाकरेंनी भाजपचं हिंदुत्व नकली असल्याची टीका करत हिंदुत्वावरून भाजपला घेरलं. आदित्य ठाकरेंनी थेट या मंदिरात महाआरतीची घेषणा करून भाजपला आणखीनच अडचणीत आणलं.

त्यामुळे गोची झालेल्या भाजपनं रेल्वे प्रशासनाकडे धावाधाव केली. त्यानंतर रेल्वे प्रशासनानं ही नोटीस रद्द केली. यामुळे भाजपनं ठाकरेंना काटशह दिल्याची चर्चा रंगली. मात्र भाजपचं हिंदुत्व नकली असून निवडणुकीपूर्व असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी झाल्यापासून त्यांनी हिंदुत्व सोडल्याची टीका भाजपकडून करण्यात येत होती. एवढंच नाही तर लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट व्होट जिहादमुळे जिंकल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत होता.

मात्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटाकडून पुन्हा हिंदुत्वाचा नारा दिला जात आहे. त्यामुळेच महापालिकेत मविआतून बाहेर पडण्याचे संकेत देत ठाकरे गट स्वबळावर लढण्याची भाषाही करत आहे. मात्र मुंबईकरांना ठाकरेंचं हिंदुत्व रुचणार की भाजपचं हिंदुत्व भावणार याचीच उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

SCROLL FOR NEXT