मुंबईत आणखी एका सायको किलरची दहशत; १५ मिनिटात दोघांची हत्या सुरज सावंत
मुंबई/पुणे

मुंबईत आणखी एका सायको किलरची दहशत; १५ मिनिटात दोघांची हत्या

सीसीटीव्हीच्या मदतीने मुंबई पोलिसांनी नराधम आरोपीला शोधून काढले आहे.

सुरज सावंत

मुंबई - रमण राघव, बियर मॅन नंतर मुंबईत आणखी एका सायको किलरने मोठ्या मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली होती. सुरेश शंकर गौडा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुंबईच्या रस्त्यांवर हा सायको किलर मोकाट फिरत होता.अशाच प्रकारे या आरोपीने त्याने 2015 साली देखील कुर्ल्यात एकाची हत्या केली होती. सीसीटीव्हीच्या मदतीने मुंबई पोलिसांनी नराधम आरोपीला शोधून काढले आहे.

हे देखील पहा -

अवघ्या 15 मिनिटात या आरोपीने दगडाने ठेचून दोन जणांची हत्या केली. मुंबई पोलिसांनी या सायको किलरला अटक केली आहे. शनिवारी अवघ्या 15 मिनिटात दोघांची हत्या झाली होती ही घटना भायखळा आणि जे जे मार्ग परिसरात घडली होती. आरोपीने फुटपाथवर झोपलेल्या दोन व्यक्तीच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक टाकून ही हत्या केली होती.

धक्कादायक म्हणजे आरोपीने चौकशी दरम्यान या हत्या आपण सहज म्हणून केल्याचे सांगोतले. अटक आरोपीचे नाव सुरेश शंकर गौडा असे असून 2015 सालीही त्याने अश्याच प्रकारे कुर्ल्यात एक हत्या केली होती. 2015 सालच्या हत्येच्या गुन्हयात या आरोपीला अटक करण्यात आली होती मात्र पुराव्याअभावी त्याची 2016 साली सुटका झाली होती. सध्या हा सायको किलर तुरुंगात असून भायखळा पोलीस दुसऱ्या हत्येच्या प्रकरणात त्याचा ताबा घेणार आहे.

Edited By - Shivnai Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT