एक जुलैपासून पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेससह, धावणार दहा गाड्या Saam Tv
मुंबई/पुणे

एक जुलैपासून पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेससह, धावणार दहा गाड्या

मध्य रेल्वे प्रशासनाने वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर येत्या एक जुलैपासून पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेससह देशाच्या विविध भागांतील दहा मार्गांवर प्रवासी सेवा सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

सागर आव्हाड

पुणे : मध्य रेल्वे प्रशासनाने Central Railway Administration वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर येत्या एक जुलैपासून पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेससह Indrayani Express देशाच्या विविध भागांतील दहा मार्गांवर प्रवासी सेवा सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. Ten trains will run with Pune-Mumbai Indrayani Express from July 1

राज्यातील विविध इंटरसिटी रेल्वे Intercity Railway लॉकडाउनमधील निर्बंध आणि घटती प्रवासी संख्या यामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रवाशांची संख्या आता 'अनलॉक'च्या Unlock पार्श्‍वभूमीवर वाढत आहे. त्यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील इंद्रायणी एक्‍स्प्रेस सेवा येत्या एक जुलैपासून सुरू होणार आहे. याशिवाय विशेष एक्‍स्प्रेसची नागपूर, अजनी, अमरावती, अहमदाबाद या मार्गांवर सेवा सुरू करण्यात येणार आहे.

  1. मुंबई-पुणे-मुंबई इंद्रायणी एक्‍स्प्रेसची सेवा येत्या एक जुलैपासून सुरू होणार आहे.

  2. दोन जुलैपासून पुणेमार्गे जाणारी कोल्हापूर-नागपूर एक्‍स्प्रेस, नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेस सुरु होणार आहे.

  3. तीन जुलैपासून, नागपूर-पुणे एक्‍स्प्रेस आणि पुणे-नागपूर एक्‍स्प्रेस

  4. चार जुलैपासून, अजनी-पुणे एक्‍स्प्रेस

  5. सात जुलैपासून, पुणे-अमरावती एक्‍स्प्रेस

  6. आठ जुलैपासून अमरावती-पुणे एक्सप्रेस धावणार आहेत.

हे देखील पहा-

नागपूर आणि अजनी धावणाऱ्या साप्ताहिक विशेष एक्‍स्प्रेससह Express पुणे-अजनी Pune-Ajani एक्‍स्प्रेस या मार्गावरून एक जुलैपासून धावणार आहेत.

दर सोमवारी, गुरुवारी आणि शनिवारी धावणारी विशेष पुणे-अहमदाबाद एक्‍स्प्रेस एक जुलैपासून धावणार आहे.

दर मंगळवारी, शुक्रवारी आणि रविवारी धावणारी विशेष अहमदाबाद-पुणे Ahmedabad-Pune एक्‍स्प्रेस दोन जुलैपासून धावणार आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT