Teacher Constituency Election SAAM TV
मुंबई/पुणे

MLC Election News : शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी ३० जानेवारीला मुंबईतील शिक्षकांना सुट्टी

Teacher Constituency Election : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मुंबईतील मतदानास पात्र शिक्षकांना ३० जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Teacher Constituency Election : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मुंबईतील मतदानास पात्र शिक्षकांना ३० जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक आणि मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे यांची मागणी मान्य झाली आहे. (Latest Marathi News)

याबाबत शिक्षण उपसंचालकांनी आज शाळांसाठी आदेश काढले आहेत. अनिल बोरनारे यांनी १७ जानेवारी रोजी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे ही मागणी केली होती.

या मागणीच्या अनुषंगाने निवडणूक अधिकाऱ्यांनी मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांना आज आदेश दिले. या आदेशान्वये शिक्षण उपसंचालकांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

३० जानेवारी रोजी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाने ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांना सुट्टी जाहीर केली आहे.

मुंबईतील शाळांमध्ये अध्यापन करणारे अनेक शिक्षक ठाणे, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यात वास्तव्यास असल्याने या शिक्षकांनी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात नोंदणी केली आहे.

मतदार नोंदणीसाठी निवासस्थान ग्राह्य धरले जाते. त्यामुळे मुंबईतील अनुदानित विना अनुदानित सेल्फ फायनान्स व अन्य शाळा व महाविद्यालयातील शिक्षकांनी निवासस्थान कोकणमध्ये असल्याने नोंदणी केली असल्याने त्यांना नियमानुसार मतदानाचा हक्क बजावता यावा, असे अनिल बोरनारे यांनी सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT