PMC News  x
मुंबई/पुणे

Pune News : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ; दोन बडे सरकारी अधिकारी निलंबित, काय आहे प्रकरण?

TDR Scam in Pune : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेतून खळबळ उडवणारी बातमी हाती आलीये. पालिकेतील दोन बड्या सरकारी अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

Akshay Badve

टीडीआर गैरप्रकाराच्या प्रकरणामुळे दोन वरिष्ठ अभियंते निलंबित

बाणेर परिसरातील इमारतीत परवानगीशिवाय 2 मजले अधिक बांधले

PMC आयुक्त नवल किशोर राम यांची तातडीने कारवाई

अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

पुण्यातून मोठी वृत्त हाती आलं आहे. ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ उडाली आहे. पुणे महापालिकेतील दोन बडे अधिकारी निलंबित करण्यात आलेत. पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना दणका दिला आहे.

पुणे महापालिकेतील टी डी आर खर्ची विभागातील कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंता यांचं निलंबन करण्यात आलं आहे. परवानगी नसताना देखील इमारतीच्या २ मजल्यांचा टी डी आर अनधिकृतपणे वाढवून दिल्याने आयुक्त नवल किशोर राम यांनी कारवाई केली. कनिष्ठ अभियंता शुभांगी तरुकमारे आणि उपअभियंता संदीप मिसाळ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील बाणेर परिसरात एका इमारतीला महापालिकेकडून पाच मजले बांधण्याची परवानगी होती. मात्र संबंधित बांधकाम व्यावसायिकाने त्यावर आणखी २ मजले वाढवण्यासाठी पालिकेतील टी डी आर विभागाकडे अर्ज केला. मात्र परवानगी मिळण्यापूर्वीच सहाव्या मजल्याचे काम पूर्ण झाले होते. तसेच सातव्या मजल्याचे काम सुरू होते. ही वस्तुस्थिती संबंधित विभागाच्या या दोन अधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली नाही. तसेच त्यांच्या कर्तव्यात कसुरी आढळल्यामुळे पालिका आयुक्त यांनी ही कारवाई केली आहे.

दोन्ही अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशीचे पालिकेचे आदेश देण्यात आले आहेत. २ दिवसांपूर्वीच पुणे महापालिकेतील ३ जणांचे निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर आज सोमवारी २ अधिकाऱ्यांचं निलंबित करण्यात आलं आहे. या कारवाईची पुणे महापालिका प्रशासनात जोरदार चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कांदिवलीत एएनसीची मोठी कारवाई, ५० लाखांचे ड्रग्स जप्त

सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक; १२ माओवादी ठार, ३ जवान शहीद

झेडपीचा धुरळा दोन टप्प्यांत, झेडपी की महापालिका, आधी कोणती निवडणूक?

Methi Bhaji Benefits: थंडीत खा मेथीची भाजी, वजन होईल कमी अन् ब्लड शुगर राहील नियंत्रणात

मुंबईत 'या' दिवशी समुद्राला मोठी भरती; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन|VIDEO

SCROLL FOR NEXT