Tanaji Sawant And Son Rishiraj Saam Tv
मुंबई/पुणे

Tanaji Sawant Son: मुलासाठी कायपण! तानाजी सावंतांचे आदेश अन् बँकॉकला निघालेलं विमान माघारी फिरलं; त्या ५ तासांत नेमकं काय घडलं?

Tanaji Sawant And Son Rishiraj: माजी मंत्री तानाजी सावंताचा मुलगा बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. त्याचे अपहरण झाल्याचे देखील बोलले जात होते. पण खरं तर तो बँकॉकला गेला होता.

Priya More

महाराष्ट्राचे माजी मंत्री तानाजी सावंत आणि त्यांचा मुलगा ऋषीराज सावंत सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. तानाजी सावंत यांचा ३० वर्षांचा मुलगा ऋषीराज कोणालाही काहीही न सांगता अचानक सोमवारी चार वाजता घरातून निघून गेला. खरं तर ऋषीराज आपल्या मित्रांसोबत चार्टर्ड फ्लाईटने बँकॉकला निघाला होता. पण तानाजी सावंत यांना आपल्या मुलाचे अपहरण झाल्याचे वाटले. त्यामुळे त्यांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार पुणे पोलिसांकडे दाखल केली. माजी मंत्र्यांचा मुलगा असल्यामुळे पुणे पोलिसांनी देखील तात्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तानाजी सावंताचा वट पाहून पुणे पोलिसांनी देखील तात्काळ तक्रार दाखल करून तपासाची सूत्रे फिरवली.

पुणे पोलिसांनी तात्काळ तानाजी सावंत यांच्या तक्रारीनंतर ऋषीराजचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यांनी अवघ्या काही मिनिटांमध्ये ऋषीराजची सर्व माहिती काढली. तपास करत असताना पुणे पोलिसांना ऋषीराज बँकॉकच्या दिशेन रवाना झाला असून तो चार्टर्ड विमानात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी लोहगाव एअरपोर्टशी संपर्क साधत अवघ्या ५ तासांमध्ये ऋषीराज सावंतचे चार्टर्ड विमान पुणे एअरपोर्टवर माघारी आणलं. पुणे पोलिसांच्या या तत्परतेची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

घडलं असं की, पुणे पोलिसांनी तपासाची सर्व चक्र फिरवत अवघ्या ५ तासांमध्ये ऋषीराजला पुण्यात परत आणले. लोहगाव एअरपोर्टवरून ऋषीराज चार्टर्ड विमानाने बँकॉकला निघाला असल्याची माहिती मिळाली. त्याचे हे विमान अंदमान- निकोबारपर्यंत पोहचले होते. पुणे पोलिसांनी लोहगाव एअरपोर्ट प्रशासनाशी संपर्क साधत हे विमान माघारी बोलवण्यास सांगितले. एअरपोर्ट प्रशासनाने चार्टर्ड विमानाच्या पायलटशी संपर्क साधत त्याला विमान माघारी घेऊन येण्यास सांगितले. पायलटने हे विमान आधी चेन्नई एअरपोर्टवर उतरवले त्यानंतर रात्री ९ वाजता हे विमान लोहगाव एअरपोर्टवर उतरवण्यात आले.

ऋषीराज सावंत घरातून निघाल्यापासून तो पुण्यात परत येण्यापर्यंत या ४ तासांमध्ये खूप वेगवान घडामोडी घडल्या. आपल्या मुलाला परत आणण्यासाठी तानाजी सावंतांनी अवघ्या काही तासांत सर्व सूत्रे हालवली. याची सध्या राज्यभर चर्चा होत आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज कौटुंबिक वादातून घरातून बाहेर पडला आणि त्याने बँकॉकला जाण्याचा प्लॅन केल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्याने बँकॉकला जाण्याचे बुकिंग केले होते. मागच्या आठवड्यात सुद्धा ऋषिराज सावंतने दुबई प्रवास केला होता. तब्बल ६८ लाख रुपये देऊन एका खासगी विमानाचे त्याने बुकिंग केले होते अशी माहिती देखील समोर आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT